Amitabh Bachchan : ‘या’ कारणामुळे जया बच्चन यांच्यासोबत तात्काळ लग्न करण्यासाठी बिग बींनी दिला होकार
वडिलांच्या हट्टामुळे अमिताभ बच्चन यांनी जया यांच्यासोबत लग्न करण्यासाठी दिला होकार, कारण... जाणून घ्या जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या लग्नाचा किस्सा
मुंबई : महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन यांच्या लग्नाला जवळपास ५० वर्ष पूर्ण झाली असतील. बिग बी आणि जया यांनी एकत्र अनेक सिनेमांमध्ये काम केलं. दोघांच्या सिनेमांना चाहत्यांनी देखील भरभरुन प्रेम दिलं. बिग बी आणि जया यांची रिल लाईफ स्टोरी आणि रियल लाईफ स्टोरी प्रचंड हटके आहे. बिग बी आणि जया यांची लव्ह स्टोरी प्रचंड भन्नाट आहे. अमिताभ बच्चन यांच्या वडिलांच्या हट्टामुळे बिग बी आणि जया यांना तात्काळ लग्न करावं लागलं. आज जया बच्चन त्यांचा ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. अनेक चाहते त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. तर याच दिवसाचं निमित्त साधत दोघांबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेवू.
जया बच्चन यांनी पहिल्यांदा अमिताभ यांना पुणे फिल्म इंस्टीट्यूट याठिकाणी पाहिलं होतं. तेव्हा बिग बी दिग्दर्शक अब्बास आणि त्यांच्या काही मित्रांसोबत बोलत उभे होते. तेव्हा अमिताभ बच्चन हे नाव फार मोठं नव्हतं. तेव्हा बिग बी देखील स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात होते. तर जया बच्चन इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होत्या.
पहिल्यांदा पाहिल्यानंतरच जया बच्चन यांना बिग बींच व्यक्तिमत्व फार आवडलं होतं. तर दुसरीकडे एका मॅगझिनच्या कव्हर पेजवर जया यांचा फोटो पाहून अमिताभ देखील अभिनेत्री प्रेमात बुडाले. नंतर दोघांमध्ये चर्चा आणि भेटीगाठी सुरू झाल्या. यासोबतच दोघांनी अनेक सिनेमांमध्ये देखील एकत्र काम केलं. अखेर दोघांच्या पहिल्या भेटीचं रुपांतर प्रेमात झालं.
१९७३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जंजीर’ सिनेमात दोघे एकत्र झळकलं. सिनेमाने चाहत्यांच्या मनात आणि बॉक्स ऑफिसवर राज्य केलं. सिनेमा सुपरहिट ठरल्यानंतर टीमने लंडन याठिकाणी फिरायला जाण्याचा प्लान केला. सिनेमाच्या यशानंतर जेव्हा लंडनला जाण्याची वेळ आली तेव्हा, बिग बींच्या वडिलांनी त्यांना लग्नाशिवाय जया यांच्यासोबत जाण्याची परवानगी दिली नाही.
लंडनला एकत्र जायचं असेल तर, आधी लग्न करा त्यानंतर फिरायला जा… वडिलांच्या हट्टानंतर अमिताभ बच्चन लग्नासाठी तयार झाले. ही गोष्ट बिग बी यांनी जया यांना सांगितली आणि आई – वडिलांच्या इच्छेने अमिताभ बच्चन आणि जया बच्चन याचं लग्न झालं. ३ जून १९७३ मध्ये सध्या पद्धतीत अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी लग्न केलं. एकदा नव्या हिच्या पॉडकास्टमध्ये जया बच्चन यांनी लग्नाबद्दल सांगितलं होतं.