VIDEO : रोमँटिक सीन करताना धर्मेंद लाजायचे, तर शत्रुघ्न सिन्हा हे कंजूस, अभिनेत्री जया प्रदाचा खुलासा

जय भानुशालीच्या एका प्रश्नाचे उत्तर देताना जया यांनी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याविषयीचा एक अनोखा किस्सा सांगितला (Jaya Prada reveals Dharmendra would get Embarrassed during romantic scenes)

VIDEO : रोमँटिक सीन करताना धर्मेंद लाजायचे, तर शत्रुघ्न सिन्हा हे कंजूस, अभिनेत्री जया प्रदाचा खुलासा
अभिनेत्री जया प्रदाचा खुलासा
Follow us
| Updated on: Apr 25, 2021 | 3:06 PM

मुंबई : बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री जया प्रदा (Jaya Prada) नुकत्याच ‘सोनी टीव्ही’च्या ‘इंडियन आयडल’ (Indian Idol 12) या कार्यक्रमात आल्या होत्या. यावेळी त्यांनी चित्रपटसृष्टीतील आपले वेगवेगळे अनुभव शेअर केले. तसेच त्यांनी आपल्या को-स्टार विषयी वेगवेगळे खुलासे केले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या जय भानुशालीने जया यांना वेगवेगळे प्रश्न विचारले. त्यावर त्यांनी मजेशीर उत्तरे दिली (Jaya Prada reveals Dharmendra would get Embarrassed during romantic scenes).

अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा अनोखा किस्सा

जय भानुशालीच्या एका प्रश्नाचे उत्तर देताना जया यांनी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याविषयीचा एक अनोखा किस्सा सांगितला. ‘शराबी’ चित्रपटाच्या गाण्याच्या चित्रिकरणादरम्यान अमिताभ बच्चन यांचा हात भाजला होता. त्यावेळी त्यांनी हाताला लपवून नृत्य करण्याची एक वेगळी स्टेप तयार केली होती, असं जया यांनी सांगितलं.

कोणत्या अभिनेत्याला रोमँटिक सीन करताना घाम फुटायचा?

जय भानुशालीने जया यांच्यासमोर स्क्रिनवर सहा दिग्गज कलाकारांचे फोटो दाखवले. यामध्ये धर्मेंद्र, राजेश खन्ना, जितेंद्र, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा आणि ऋषी कपूर या दिग्गज अभिनेत्यांचा समावेश होता. या सहा अभिनेत्यांसोबत काम करताना कोणत्या अभिनेत्याला रोमँटिक सीन करताना जास्त घाम फुटायचा? असा प्रश्न जय भानुशाली याने जया यांना विचारला. त्यावर त्यांनी धर्मेंद्र यांचं नाव घेतलं.

जया यांचं उत्तर

“मला धर्मेंद्र हे हिरो पेक्षा मित्र म्हणून जास्त जवळचे वाटतात. मात्र, ते तालमीत जे करायचे ते टेकमध्ये नाही करायचे. कारण टेकमध्ये ते दुसरंच काहीतरी करायचे”, असं जया प्रदा यांनी सांगितलं (Jaya Prada reveals Dharmendra would get Embarrassed during romantic scenes).

कंजूस अभिनेता कोण?

यानंतर जय भानुशाली याने सहा को-स्टारपैकी कोणता अभिनेता कंजूस होता? असा प्रश्न विचारला. त्यावर जया यांनी ‘खामोश’ असं उत्तर दिलं. खामोश हा शत्रुघ्न सिन्हा यांचा प्रसिद्ध डायलॉग आहे. त्यामुळे त्यांनी नाव न घेता या प्रश्नाचं उत्तर दिलं.

जया प्रदा कार्यक्रमात भावूक

जया प्रदा यांनी कार्यक्रमात काही स्पर्धकांच्या गाण्यावर नृत्य देखील केलं. या कार्यक्रमात त्या भावूक देखील झाल्या. यावेळी त्यांच्या डोळ्यांमध्ये पाणीदेखील आलं होतं. जया बॉलिवूडमध्ये एकेकाळच्या टॉपच्या अभिनेत्री होत्या. त्यांनी जवळपास सगळ्याच मोठमोठ्या अभिनेत्यांसोबत काम केलंय.

पाहा व्हिडीओ :

हेही वाचा : Trishala Dutt : सात वर्षांच्या रिलेशनशिप नंतर ब्रेकअप…, संजय दत्तची मुलगी त्रिशालाने सांगितली खासगी गोष्ट

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.