Jhimma 2 Review : ‘झिम्मा 2’ पहायचा प्लॅन करताय? मग हा रिव्ह्यू एकदा नक्की वाचा!

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा 2' या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली होती. प्रेक्षक-समीक्षकांकडून त्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. आता दुसऱ्या भागात सात जणी कुठे फिरायला जाणार आणि त्यात कोणते किस्से घडणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

Jhimma 2 Review : 'झिम्मा 2' पहायचा प्लॅन करताय? मग हा रिव्ह्यू एकदा नक्की वाचा!
Jhimma 2 ReviewImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Nov 23, 2023 | 2:03 PM

मुंबई : 23 नोव्हेंबर 2023 | प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो, ही शिकवण देत ‘झिम्मा’मधील नायिकांनी प्रेक्षकांच्या मनात एक नवी ऊर्जा आणि नवा उत्साह आणला. प्रत्येक बाईची तऱ्हा वेगळी पण जेव्हा त्या सगळ्या एकत्र येतात, तेव्हा त्या वेगळेपणातही नाविन्य, आपुलकीची भावना पहायला मिळते. ‘झिम्मा’मधल्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात स्वत:चं विशेष निर्माण केलं होतं. त्यामुळे या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. इरावती कर्णिक लिखित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा 2’ हा चित्रपटसुद्धा पहिल्या भागाप्रमाणेच एक नवीन उमेद मनात निर्माण करतो. पहिल्या भागातीत नायिकांची एकमेकांशी फारशी ओळख नव्हती. पण आता त्या खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या आहेत. ही मैत्री निर्माण झाल्यानंतर त्यांच्या नात्यात आणि कथेत काय नाविन्य पहायला मिळेल, याची उत्सुकता ‘झिम्मा 2’ टिकवून ठेवतो.

‘झिम्मा 2’च्या निमित्ताने पुन्हा एकदा सात जणी एकत्र सहलीला निघाल्या आहेत. मात्र यावेळी दोन नवीन पात्रं या चित्रपटात पहायला मिळतात. त्यापैकी एक म्हणजे निर्मलाची सून तान्या (रिंकू राजगुरू) आणि दुसरी म्हणजे वैशालीची भाची मनाली (शिवानी सुर्वे). इंदूचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ही सहल काढण्यात येते. यासाठी युकेमधील लेक डिस्ट्रिक्ट ही जागा निवडण्यात आली आहे. कृतिकाने (सायली संजीव) तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्न केलंय आणि लेक डिस्ट्रिक याठिकाणी ती दीर ॲलिस्टरसोबत बेड अँड ब्रेकफास्ट हॉटेल सांभाळते. त्याच ठिकाणी ती सर्वांना इंदूच्या वाढदिवसानिमित्त सहलीला बोलावते. या प्रवासात पुढे कोणकोणते किस्से घडतात, सात जणी एकत्र आल्यानंतर काय धमाल होते आणि या सर्वांत कबीर (सिद्धार्थ चांदेकर) आपलं वेगळेपण कसं दाखवून देतो, हे सर्व ‘झिम्मा 2’मध्ये पहायला मिळतं.

पहिल्या भागातील सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी गोडबोले यांची जागा आता दुसऱ्या भागात रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे या दोन नवीन पात्रांनी घेतली आहे. निर्मलाच्या सुनेच्या भूमिकेत रिंकू अगदी चपखल बसली असून या दोघींची जोडी संपूर्ण चित्रपटादरम्यान खळखळून हसवते. सासू-सुनेच्या या नव्या जोडीने ‘झिम्मा 2’मध्ये आपली वेगळीच छाप सोडली आहे. तर वैशालीच्या भाचीच्या भूमिकेलाही शिवानीने न्याय दिला आहे.  सुहास जोशी, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव यांनी पहिल्या भागाप्रमाणेच वेगवेगळ्या वयांतील आणि परिस्थितीतील स्त्रिया उत्तमरित्या साकारल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

चित्रपटात सात नायिका आणि एक नायक आहे म्हटल्यावर कथेत समतोल साधण्याचं मोठं आव्हान लेखकासमोर असतं. मात्र हे काम इरावती कर्णिक यांनी पुन्हा एकदा तितक्याच सहजतेनं पार पाडलं आहे. विशेष म्हणजे यापैकी कोणाचीच कथा रटाळवाणी वाटत नाही. छोटे छोटे तुकडे एकत्र जोडावेत आणि त्याचा एक मोठा आणि सुंदर चित्र तयार व्हावा, असा हा लेखिकाचा प्रयत्न पुन्हा एकदा यशस्वी ठरतो.

संपूर्ण चित्रपटात लेक डिस्ट्रिकमधील नयनरम्य दृश्ये पाहून त्याठिकाणी एकदा तरी भेट नक्की द्यावी, अशी इच्छा मनात निर्माण होते. याचं संपूर्ण श्रेय कॅमेरामन आणि सिनेमॅटोग्राफरला जातं. फक्त चित्रपटाची कथाच उत्तम असून चालत नाही, तर त्या कथेला योग्य न्याय देणारा दिग्दर्शकही तितकाच महत्त्वाचा असतो. हेमंत ढोमेनं या सात जणींच्या सात तऱ्हा उत्तमरित्या हाताळण्याची किमया साधली आहे. झिम्माच्या पहिल्या भागात सिद्धार्थ चांदेकरने या सात जणींना एकत्र बांधून ठेवलं होतं. आता दुसऱ्या भागात सातही जणींचं आपापलं स्वातंत्र्य असतानाही सिद्धार्थने त्याचं स्वातंत्र्य जपत स्वत:ची भूमिका एकदम परफेक्ट साकारली आहे. पहिल्या भागाप्रमाणेच हा दुसरा भागसुद्धा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचं भरभरून मनोरंजन करणारा आहे.

‘झिम्मा 2’ला ‘टीव्ही 9 मराठी’कडून 4 स्टार्स

दिग्दर्शक- हेमंत ढोमे कलाकार- सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे, सिद्धार्थ चांदेकर कथा- हेमंत ढोमे पटकथा आणि संवाद- इरावती कर्णिक

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.