AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jhimma 2 Trailer : सात मैत्रिणी, सात तऱ्हा.. ‘झिम्मा 2’मध्ये पहायला मिळणार डबल धमाल!

सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव आणि सिद्धार्थ चांदेकर या गेल्या भागातील कलाकारांसोबत आता रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे या दोघी तगड्या स्टारकास्टमध्ये दाखल झाल्या आहेत. ‘स्वत्त्व’ शोधायला लावणारा हा चित्रपट पुन्हा जोमाने आपल्या मैत्रिणींच्या भेटीला येत आहे.

Jhimma 2 Trailer : सात मैत्रिणी, सात तऱ्हा.. 'झिम्मा 2'मध्ये पहायला मिळणार डबल धमाल!
Jhimma 2 Official TrailerImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Nov 14, 2023 | 10:33 AM

मुंबई : 14 नोव्हेंबर 2023 | ‘झिम्मा’ या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर आता लवकरच ‘झिम्मा 2’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात दिग्दर्शक हेमंत ढोमे, सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे, सिद्धार्थ चांदेकर, अनंत जोग, संगीतकार अमितराज, गायिका वैशाली सामंत यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. दिव्यांची रोषणाई, रंगीबेरंगी कंदील, रांगोळ्या, उत्साही वातावरण, चमचमीत फराळ आणि पारंपरिक पेहराव असा एकंदर हा दैदिप्यमान सोहळा रंगला होता. यावेळी दिवाळी साजरी करत, चविष्ट फराळाचा आस्वाद घेत कलाकारांनी धमाल केली. यानिमित्ताने ‘या’ सात मैत्रिणींनी पुन्हा एका रियुनियन साजरा केला.

यापूर्वी ‘झिम्मा’मधून या सात मैत्रिणी प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. आता ‘झिम्मा 2’मधून या मैत्रिणींना पुन्हा भेटण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. या ताफ्यात आता आणखी दोन मैत्रिणी सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे आता धमालही दुपटीने वाढली आहे. इंदू (सुहास जोशी) यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या सहलीत काही सरप्राइजेससुद्धा आहेत. मागच्या वेळेप्रमाणे ही ट्रीपही अविस्मरणीय होणार असून ‘झिम्मा’च्या निमित्ताने बहरलेल्या या मैत्रीची वीण ‘झिम्मा 2’मध्ये अधिकच घट्ट होणार आहे.

पहा ट्रेलर-

हे सुद्धा वाचा

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला, ”खरंतर ‘झिम्मा’मध्ये दिसलेल्या या मैत्रिणी फक्त पडद्यावरच नाही तर पडद्यामागेही तशाच एकमेकींना जीव लावणाऱ्या आहेत. त्यामुळे ‘झिम्मा 2’मध्ये त्यांची ही मैत्री अधिकच घनिष्ट दिसणार आहे. सात मैत्रिणी, सात तऱ्हा. प्रत्येकीची प्रेम व्यक्त करण्याची भाषा वेगळी आहे. देहबोली वेगळी आहे. परंतु समान गोष्ट एकच आहे ती म्हणजे त्यांचं एकमेकांविषयी असलेलं प्रेम. ‘झिम्मा’ पाहून सहलीला गेलेल्या मैत्रिणी ‘झिम्मा 2’ पाहून दुसऱ्यांदा सहलीचं आयोजन करतील, हे नक्की! ‘झिम्मा 2’ हा प्रत्येक प्रेक्षकवर्गासाठी आहे. बऱ्याचदा दुसऱ्यांना खुश ठेवण्याच्या नादात आपण स्वत्व गमावतो आणि त्याचाच शोध तुम्हाला ‘झिम्मा 2’मध्ये गवसणार आहे.”

कलर यल्लो प्रॉडक्शनच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चिलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मित ‘झिम्मा 2’ येत्या 24 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

पंतप्रधानांचा चेहरा पाहता असं वाटतं.... संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल
पंतप्रधानांचा चेहरा पाहता असं वाटतं.... संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल.
पश्चिम रेल्वेने प्रवास करताय?आज 4 तास मेगाब्लॉक, कोणत्या वेळात असणार?
पश्चिम रेल्वेने प्रवास करताय?आज 4 तास मेगाब्लॉक, कोणत्या वेळात असणार?.
मुंबईकरांनो.... या रविवारी लोकलने बिनधास्त फिरा, कारण मध्य रेल्वेवर...
मुंबईकरांनो.... या रविवारी लोकलने बिनधास्त फिरा, कारण मध्य रेल्वेवर....
लाडक्या बहिणींनो... 2100 रूपये मिळणार पण...उदय सामंत बघा काय म्हणाले?
लाडक्या बहिणींनो... 2100 रूपये मिळणार पण...उदय सामंत बघा काय म्हणाले?.
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.