‘लोकांना माझ्याकडून फक्त शरीरसुख हवं होतं, पण कोणी..’, पत्रकार जिग्ना वोराचा धक्कादायक खुलासा

माजी रिपोर्टर जिग्ना वोरा बिग बॉसच्या घरात त्यांच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या आहेत. आपल्या भूतकाळाचा मुलावर वाईट परिणाम होऊ नये यासाठी त्यांनी त्याला स्वत:पासून दूर पाठवल्याचं सांगितलं. जुन्या आठवणींविषयी बोलताना यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.

'लोकांना माझ्याकडून फक्त शरीरसुख हवं होतं, पण कोणी..', पत्रकार जिग्ना वोराचा धक्कादायक खुलासा
Jigna VoraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 21, 2023 | 1:25 PM

मुंबई : 21 नोव्हेंबर 2023 | ‘बिग बॉस 17’मध्ये स्पर्धक म्हणून माजी क्राइम रिपोर्टर जिग्ना वोरा सहभागी झाली आहे. या शोमध्ये जिग्ना अनेकदा त्यांच्या आयुष्यातील संघर्षांबद्दल मोकळेपणे व्यक्त झाल्या आहेत. आता नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये त्या त्यांच्या मुलाला आठवून भावूक होतात. जिग्ना यांनी त्यांच्या आयुष्यातील एक कटू सत्य सर्वांसमोर मांडलंय. ऐश्वर्या शर्मासोबत बोलताना जिग्ना सांगतात की, त्या मनावर दगड ठेवून मुलाला स्वत:पासून आणि मुंबईपासून दूर ठेवतात. जेणेकरून त्यांच्या भूतकाळाची सावली मुलावर पडू नये आणि त्याच्यावर वाईट परिणाम होऊ नये.

“मी माझ्या मुलाला इथून पाठवलं आहे. त्याच्या सुरक्षेसाठी. कारण तो इथे राहिला आणि त्याच्यावर कोणी प्रश्न उपस्थित केलेलं मला चालणार नाही. माझा एकुलता एक मुलगा आहे. त्यामुळे या सर्व कारणांमुळे असं वाटतं की तो इथून दूर आहे तरच ठीक आहे”, असं त्या म्हणतात. मुलाबद्दल बोलताना त्यांना अश्रू अनावर होतात. “मी त्याला स्वत:पासून दूर कसं पाठवलं असेल, जरा विचार कर”, असं म्हणत त्या रडतात.

“त्याने रिस्क घ्यावी अशी माझी इच्छा नाही. त्याला इथे नोकरी मिळत नव्हती. तू एका गुन्हेगाराचा मुलगा आहे, असं त्याला हिणवायचे. मुंबईत इंजीनिअरिंगमध्ये त्याला ॲडमिशन मिळालं नाही. अखेर पुण्याला जाऊन त्याला हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करावा लागला. मलासुद्धा नंतर नोकरी मिळत नव्हती. शरीरसुखाची मागणी करणारे 100 लोक होते, पण नोकरी द्यायला कोणीच तयार नव्हतं. मला डेटवर घेऊन जायला कोणालाच समस्या नव्हती. पब्लिक फेस आहे ना. 100 पैकी किमान दोन लोक तरी ओळखतील की अरे ही मर्डरर जिग्ना वोरा आहे. मला हॉटेल रुममध्ये घेऊन जाण्याला सीईओला कोणतीच समस्या नव्हती. पण मला नोकरी आणि आदर देण्यात त्यांना समस्या होती”, अशा शब्दांत जिग्ना आपलं दु:ख व्यक्त करतात.

हे सुद्धा वाचा

कोण आहेत जिग्ना वोरा?

जिग्ना वोरा या मुंबई मिरर, फ्री प्रेस जर्नल आणि मिड डे यांसारख्या वृत्तपत्रांसाठी क्राइम रिपोर्टर म्हणून काम करत होत्या. त्यांचं नाव मोठ्या वादांमध्ये समोर आलं होतं. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसोबतही तिचं कनेक्शन असल्याचा आरोप झाला होता. 11 जून 2011 रोजी झालेल्या पत्रकार ज्योतिर्मय यांच्या हत्येप्रकरणी काही लोकांची नावं समोर आली होती. यामध्ये जिग्नाचाही समावेश होता. या आरोपानंतर जिग्नाला सहा वर्षे तुरुंगात राहावं लागलं होतं. ज्योतिर्मय यांच्या हत्येप्रकरणी ज्या आरोपींची नावं समोर आली होती, त्यामध्ये अंडरवर्ल्ड गँगस्टर छोटा राजनसुद्धा होता. छोटा राजन आणि जिग्ना यांच्यावर ज्योतिर्मय यांच्या हत्येचा आरोप होता.

2012 मध्ये लांबलचक चौकशी प्रक्रियेनंतर पोलिसांनी जिग्नाविरोधात अनेक कलमांअंतर्गत चार्जशीट दाखल केली होती. या आरोपाखाली तिला सहा वर्षांपर्यंत तुरुंगात राहावं लागलं होतं. त्यानंतर तिची सुटका झाली. जिग्ना वोराच्या आयुष्यावर आधारित एक वेब सीरीजसुद्धा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केलेल्या या वेब सीरिजचं नाव ‘स्कूप’ असं होतं. ज्यामध्ये अभिनेत्री करिश्मा तन्नाने जिग्नाची भूमिका साकारली होती.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.