AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajat Tokas | 8 वर्षांनंतर रजत टोकस दिसतोय असा? फोटो पाहून चाहते म्हणाले, ‘हा खरंच जोधाचा अकबर आहे?’

'जोधा अकबर' मालिकेतून चाहत्यांच्या भेटीस आलेला रजत टोकसच्या लूकमध्ये मोठे बदल; 8 वर्षांनंतर असा दिसतोय अभिनेता.. फोटो पाहून तुम्हालाही बसणार नाही विश्वास

Rajat Tokas | 8 वर्षांनंतर रजत टोकस दिसतोय असा? फोटो पाहून चाहते म्हणाले, 'हा खरंच जोधाचा अकबर आहे?'
Follow us
| Updated on: May 29, 2023 | 12:30 PM

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत, जे मालिकांच्या माध्यमातून घरा-घरात पोहोचले, पण काही काळानंतर गायब झाले. अशाच अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अभिनेता रजत टोकस. (Rajat Tokas) रजत टोकस हे टीव्ही विश्वातील फार मोठं नाव आहे. रजत टोकस याने ‘पृथ्वीराज चौहान’ आणि ‘जोधा अकबर’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलं. आज अभिनेता कुठे आहे, काय करत आहे? याबद्दल काही माहिती नाही. पण आजही रजत टोकस हा चाहत्यांच्या आठवणीत कायम आहे. आपल्या दमदार अभिनयाने रजतने चाहत्यांना थक्क केलं. शिवाय त्याच्या लूकवर तर असंख्य मुली फिदा झाल्या.. एक काळ होता जेव्हा अभिनेता रजत टोकस याची सर्वत्र चर्चा रंगत होती. रजतला पुन्हा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत..

रजत आता अभिनय क्षेत्रात सक्रिय नसला तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. सध्या रजतचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेता प्रचंड हॅंडसम दिसत आहे. रजतने नुकताच स्वतःचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. अभिनेत्याची नवी सोशल मीडियावर पोस्ट सध्या तुफान चर्चेत आहे..

हे सुद्धा वाचा

रजत टोकसच्या फोटोवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. काही चाहते अभिनेत्याच्या लूकचं कौतुक करत आहेत, तर काही चाहत्यांना अभिनेत्याची स्माईल प्रचंड आवडली आहे.. महत्त्वाचं म्हणजे, रजत टोकस याने फोटो शेअर केला आहे, पण कॅप्शन लिहिलेलं नाही.. तरी देखील सोशल मीडियावर रजतच्या फोटोची तुफान चर्चा रंगत आहे..

रजतने फोटो पोस्ट करताच चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये प्रमे व्यक्त केलं आहे. एक युजर कमेंट करत म्हणाला, ‘टचवूड.. तु्झ्या स्माईलला कोणची नजर नको लागायला..’, तर दुसरा युजर कमेंट करत म्हणाला, ‘पुन्हा अभिनय क्षेत्रात कधी पदार्पण करणार आहेस.. चाहते तुला प्रचंड मिस करत आहेत..’ फक्त कमेंट नाही तर असंख्य चाहत्यांनी रजतच्या लूकवर पसंती दर्शवली आहे.

रजत टोकस याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने २०१५ मध्ये गर्लफ्रेंड सृष्टी नैयर हिच्यासोबत लग्न केलं आहे.. सध्या अभिनेता आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे. शिवाय रजत पत्नी सृष्टीसोबत सोशल मीडियावर फोटो देखील पोस्ट करत असतो. अभिनेत्याच्या पत्नीच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री देखील फेल आहेत..

एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.