‘द पायरट्स ऑफ करेबियन’ फेम जॉनी डेपनं जिंकला मानहानी खटला! पत्नीकडून मिळणार तब्बल 116.33 कोटी भरपाई
Johnny Depp : 2015 साली त्यांनी एकमेकांशी लग्न केलं. पण 15 महिन्यांच्या संसारानंतर त्यांनी काडीमोड घेतला.
मुंबई : जगप्रसिद्ध अभिनेता जॉनी डेप (Johnny Depp) यांनं आपल्या पत्नीविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. जॉनी डेपने एंबर हर्ड या आपल्या पूर्व पत्नीविरोधात दाखल केलेला मानहानी खटला अखेर जिंकल्यानं त्याला आता तब्बल 116 कोटी 33 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. जॉनी डेपने खरंतर आधी 50 मिलियन डॉलर्स इतक्या नुकसान भरपाईची मागणी केली होती. पण अखेर 15 मिलियन डॉलर्स इतकी नुकसान भरपाई देण्याचे आदेश जॉनी डेपची पत्नी एंबर हर्ड (Amber Heard) हिला देण्यात आले आहेत. पायरेट्स ऑफ कॅरेबियन (pirates of the Caribbean) या सिनेमासाठी जॉनी डेप हा ओळखला जातो. जॉनीला तीन वेळा ऑस्करसाठी नामांकन मिळालंय. तर प्रतिष्ठेचा गोल्डन ग्लोब पुरस्काराचाही तो मानकरी ठरला होता. गेल्या काही दिवसांपासून जॉनी आणि त्याच्या पत्नीमध्ये सुरु असलेल्या खटल्याची तुफान चर्चा रंगली होती. अखेर हा खटला जॉनीने जिंकलाय.
कोर्टाच्या निकालानंतर जॉनीने काय म्हटलं?
हे सुद्धा वाचाView this post on Instagram
काय प्रकरण?
अभिनेत जॉनीवर त्याची पत्नी एंबरने लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले होते. हे आरोप खोटे असल्याचा दाव करत जॉनीने डिफमेशन केस (मानहानीचा खटला) दाखल केली होती. हे सगळं प्रकरण 2018 सालापासून सुरु झालं. एका दैनिकात भलामोठा लेख लिहून एंबरने आपल्या मनातली खदखद मांडली होती. कौंटुबीक हिंसाचाराचे बळी असल्याचा आरोप एंबरने केला होता.
याआधी 2016 साली एंबर हर्डने जॉनीवर मारहाणीचा आरोपही केलेला होता. लेखात करण्यात आलेले सनसनाटी आरोप जॉनीला सहन झाले नाहीत आणि झालेल्या अपमानाविरोधात त्यानं न्यायालयात पत्नीविरोधात खटला दाखल केला. पत्नीविरोधात जॉनीने खटला दाखल केल्यानंतर पत्नी एंबरनेही जॉनीविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. जॉनीने 50 मिलियन तर एंबरने 100 मिनियन डॉलरचा परस्परविरोधी खटला दाखल केला होता.
कोर्टाच्या निकालानंतर एंबरला धक्का
— Amber Heard (@realamberheard) June 1, 2022
लग्नानंतर 15 महिन्यात घटस्फोट
2011 साली जॉनी आणि एंबर एकमेकांना पहिल्यांदा भेटले होते. द रम डायरी सिनेमाच्या सेटवर त्यांची ओळख झाली. त्यानंतर पुन्हा काही वर्षांनी ते सिनेमाच्या प्रमोशनसाठी भेटले. नंतर ते एकमेकांना डेट करुन लागले. 2015 साली त्यांनी एकमेकांशी लग्न केलं. पण 15 महिन्यांच्या संसारानंतर ते वेगळे झाले.
एंबरने चेहऱ्यावर असलेल्या मारहाणीच्या खुणा दाखवत घटस्फोटासाठी अर्ज केला आणि जॉनीवर गंभीर आरोपही केले होते. घटस्फोटानंतर एंबरला जॉनने 70 लाख डॉलर्स दिले होते. आता जॉनीनं मानहानीचा खटला दाखल करत तो जिंकला देखील आहे.