‘माचिस’ फेम अभिनेत्याला मुलासोबत पाहून चाहते थक्क! नेटकरी म्हणाले ‘कधीच विसरू शकत नाही’

'आठवतंय का, म्हणजे काय? ज्यांनी कोणी आर्या पाहिला असेल त्यांना समजेल की सुष्मिता सेनपेक्षा या अभिनेत्याला पाहण्याची उत्सुकता अधिक होती', असं एकाने लिहिलं. तर 'आमदनी अठ्ठनी खर्चा रुपय्या' या चित्रपटाचं नाव लिहित अनेकांनी त्याचं कौतुक केलं.

'माचिस' फेम अभिनेत्याला मुलासोबत पाहून चाहते थक्क! नेटकरी म्हणाले 'कधीच विसरू शकत नाही'
Chandrachur SinghImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 02, 2023 | 5:12 PM

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे बरेच कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या दमदार अभिनयकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मात्र या कलाकारांना नशिबाची फारशी साथ मिळाली नाही. त्यामुळे त्यांचा इंडस्ट्रीतील कार्यकाळ हा फार कमी राहिला. मात्र या कमी काळातही या कलाकारांनी प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहतील अशा भूमिका साकारल्या आहेत. असाच एक अभिनेता म्हणजे चंद्रचूड सिंह. वयाची पन्नाशी ओलांडलेल्या या अभिनेत्याला नुकतंच पापाराझींनी मुंबई एअरपोर्टवर पाहिलं. यावेळी त्याच्यासोबत त्याचा मुलगासुद्धा होता. चंद्रचूडने यावेळी पापाराझींना फोटोसाठी मुलासोबत पोझ दिले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

‘हा अभिनेता आठवतोय का’, असं कॅप्शन लिहित एका पापाराझी अकाऊंटवर चंद्रचूडचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. त्यावर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘आठवतंय का, म्हणजे काय? ज्यांनी कोणी आर्या पाहिला असेल त्यांना समजेल की सुष्मिता सेनपेक्षा या अभिनेत्याला पाहण्याची उत्सुकता अधिक होती’, असं एकाने लिहिलं. तर ‘आमदनी अठ्ठनी खर्चा रुपय्या’ या चित्रपटाचं नाव लिहित अनेकांनी त्याचं कौतुक केलं. ‘चांगल्या कलाकारांना कोणीच विसरू शकत नाही’, असंही दुसऱ्या युजरने म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

‘जोश’, ‘माचिस’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकलेला चंद्रचूड सिंह काही चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर इंडस्ट्रीतून गायब झाला. यामागचं कारण म्हणजे 2000 त्याचा भीषण अपघात झाला आणि त्यामुळेच त्याचं बॉलिवूडमधील करिअर संपुष्टात आलं होतं. गोव्यात जेट स्कीईंग करताना त्याचा तोल सुटला. त्याचवेळी त्याची स्पीड बोट वेगाने पुढे जात असताना चंद्रचूडच्या उजव्या हाताला जबर मार लागला. हा अपघात इतका भीषण होता की त्यात त्याचा हात पूर्णपणे धडापासून वेगळा झाला असता. पण दैव बलवत्तर म्हणून चंद्रचूडसोबत असं काही घडलं नाही. मात्र त्यानंतर त्याला आठ वर्षांचा ब्रेक घ्यावा लागला होता.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.