Juhi Chawla | विवाहित जय मेहता यांच्यावर जडला होता जुहीचा जीव; मोठ्या कारणामुळे अनेक वर्ष लपवलं लग्न

जुही चावला - जय मेहता यांनी गुपचूप उरकलं लग्न; मेहता यांच्या पहिल्या पत्नीच्या हृदयद्रावक निधनानंतर माजली होती सर्वत्र खळबळ..., अभिनेत्रीला का लपवावं लागलं लग्न?

Juhi Chawla | विवाहित जय मेहता यांच्यावर जडला होता जुहीचा जीव; मोठ्या कारणामुळे अनेक वर्ष लपवलं लग्न
Follow us
| Updated on: Jun 03, 2023 | 12:09 PM

मुंबई : ‘डर’, ‘कयामत से कयामत तक’, ‘यस बॉस’, ‘भूतनाथ’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘हम हैं राही प्यार के’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री जुही चावला हिने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. जुही कायम तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे चर्चेत राहिली. अभिनेत्रीचं खासगी आयुष्य कायम गुलदस्त्यात होतं. एक काळ असा होता, जेव्हा जुहीने फक्त चाहत्यांच्या मनातच नाही तर, सेलिब्रिटींच्या मनात देखील घर केलं होतं. बॉलिवूडचा एक काळ गाजवलेली अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल क्वचितच बोलताना दिसते. जुहीच्या लव्हलाईफ बद्दल देखील फार कमी लोकांना माहिती आहे. फिल्मस्टार जुही चावलाने १९९५ मध्ये पती जय मेहतासोबत लग्न केलं. पण अभिनेत्रीने तिचं लग्न अनेक वर्षे लपवून ठेवलं. यामागचं कारण देखील अभिनेत्रीच्या फार कमी चाहत्यांना माहिती आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जुहीने श्रीमंत उद्योगपती जय मेहता यांच्यासोबत लग्न केलं. जय मेहता हे मेहता ग्रुपचे मालक आहे. त्यांच्या व्यवसायाची ख्याती जगभर पसरलेली आहे. सिमेंट, साखर अशा अनेक उत्पादनांमध्ये जय मेहता काम करतात. जय मेहता यांचे आई-वडील महेंद्र मेहता आणि सुनन्या मेहता होते. नानजी कालिदास मेहता यांचे ते नातू आहेत. ज्यांनी मेहता ग्रुपची स्थापना केली.

जय मेहता आणि जुही चावला यांच्या पहिल्या भेटीबद्दल सांगायचं झालं तर, दोघांची पहिली भेट दिग्दर्शक राकेश रोशन यांच्या माध्यमातून झाली होती. दोघे फक्त एकमेकांना ओळखत होते. पण तेव्हा जय मेहता विवाहित होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव सुजाता बिर्ला होतं. सुजाता बिर्ला या यश बिर्ला यांच्या बहीण होत्या.

हे सुद्धा वाचा

कारोबार शुटिंगच्या दरम्यान जय मेहता आणि जुही चावला यांच्यातील मैत्री घट्ट झाली. याच दरम्यान जय मेहता यांच्या पहिल्या पत्नी सुजाता बिर्ला यांचे १९९० मध्ये विमान अपघातात हृदयद्रावक निधन झालं. पत्नीच्या निधनानंतर जय मेहता पूर्णपणे कोलमडले होते. पत्नीच्या निधनानंतर मैत्रीण म्हणून जुहीने जय मेहता यांना साथ दिली. हळूहळू दोघांची मैत्री प्रेमात बदलत होती आणि दोघांनी आयुष्यात पुढे जाण्याचा देखील निर्णय घेतला होता.

पण काही काळ सरल्यानंतर जुहीवर देखील दुःखाचा डोंगर कोसळला..जुहीच्या आईचं कार अपघातात निधन झालं. तेव्हा जय मेहता यांनी जुहीला सांभाळलं. ज्यामुळे दोघांच्या लग्नाला आणखी उशीर झाला. आईच्या निधनाच्या धक्क्यातून सावरण्यासाठी फार काळ लागला. अखेर अभिनेत्रीने उद्योजक जय मेहता यांच्यासोबत गुपचूप लग्न केलं

एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘तेव्हा प्रत्येक ठिकाणी कॅमेरे नव्हते, इंटरनेट नव्हता… जय माझी काळजी घेत होते.. मला माझ्या करियरची भीती वाटत होती..तेव्हा माझं करियर यशाच्या उच्च शिखरावर होतं. मला काम करायचं होतं. त्यामुळे मी मधला रस्ता अवलंबला…’ असं अभिनेत्री म्हणाली.

जेव्हा लग्नानंतर अभिनेत्री पहिल्यादा गरोदर राहिली, तेव्हा अभिनेत्रीच्या लग्नाबद्दल चाहत्यांना माहिती मिळाली. जुही आणि जय यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या मुलीचं नाव जाह्नवी मेहता आणि मुलाचं नाव अर्जुन मेहता असं आहे.

Non Stop LIVE Update
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.