जेव्हा ऋषी कपूर जुही चावलाला म्हणाले ‘इन्सिक्युअर’, अभिनेत्रीने शेअर केला जुना किस्सा…

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) गेल्या वर्षी 30 एप्रिल रोजी जगाचा निरोप घेऊन गेले. त्यांचे कुटुंब आणि चाहते आजतागायत या धक्क्यातून बाहेर येऊ शकलेले नाहीत.

जेव्हा ऋषी कपूर जुही चावलाला म्हणाले ‘इन्सिक्युअर’, अभिनेत्रीने शेअर केला जुना किस्सा...
जुही चावला, ऋषी कपूर
Follow us
| Updated on: Apr 29, 2021 | 4:50 PM

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) गेल्या वर्षी 30 एप्रिल रोजी जगाचा निरोप घेऊन गेले. त्यांचे कुटुंब आणि चाहते आजतागायत या धक्क्यातून बाहेर येऊ शकलेले नाहीत. ऋषी कपूरसोबत त्यांच्या शेवटच्या ‘शर्माजी नमकीन’ या चित्रपटात जुही चावला (Juhi Chawla) काम करत होती. पण ऋषी कपूरला या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करता आले नाही. आता या चित्रपटात ऋषी कपूरऐवजी परेश रावल दिसणार आहेत. जूही चावला यांनी ऋषी कपूरची आठवण काढत एक जुना किस्सा शेअर केला आहे (Juhi Chawla Share Rishi Kapoor memories from last film set).

टाईम्स ऑफ इंडियाशी खास बातचीत करताना जूही चावला म्हणाली की, बाहेरून पाहताच ऋषीजी जितके रागीट वाटायचे, मात्र तितकेच ते खूप खेळकर स्वभावाचे होते. सेटवर ते नेहमीच माझी गंमत करत असायचे. त्यांनी एकदा मला ‘इन्सिक्युअर’ अभिनेत्री म्हटले होते. कारण, प्रत्येक शॉटनंतर मी मॉनिटरसमोर समीक्षा करण्यासाठी जात होते.

चिंटूजी खूप हळव्या मनाचे!

जूही चावला म्हणाली की, चिंटूजींची बोलण्याची पद्धत खूप वेगळी होती. जेव्हा जेव्हा ते बोलत असत, तेव्हा असे वाटत होते की ते तुमच्यावर ओरडत आहे. ते बाहेरून कडक दिसत होते, पण आतून ते तसे नव्हते. एकदा ते कसा आहेत, हे मला समजल्यानंतर, त्यांच्याशी बोलण्याचा मला खूप आनंद झाला (Juhi Chawla Share Rishi Kapoor memories from last film set).

जूही चावलाने सांगितले की, एक दिवस त्यांनी मला ‘इन्सिक्युअर’ अभिनेत्री म्हटले होते, कारण प्रत्येक शॉटनंतर मी मॉनिटरकडे जात होते. त्यांचे शॉट्स उत्कृष्ट होते आणि मी मात्र काळजी करत होते की, मी ते योग्य प्रकारे करते आहे की नाही. ते त्यांच्या नेहमीच्या शैलीत माझ्यावर ओरडले आणि म्हणाले, ‘तो मॉनिटर दिग्दर्शकासाठी आहे, तुमच्यासाठी नाही,  इन्सिक्युअर अभिनेत्री. ते खूप मजेशीर होता. तो बाहेरून इतका का कठोर आहे, हे मी कधीही त्यांना विचारले नाही. परंतु, कालांतराने मी या गोष्टींचा आनंद घेऊ लागलो कारण तो खूप क्युट होता.

गणपतीच्या दर्शनाला बोलावले…

ऋषी कपूर यांचे स्मरण करताना जूही चावला म्हणाल्या की, त्या बर्‍याच वर्षांपासून कपूर घराण्याच्या गणपती उत्सवांमध्ये गेली नव्हती. त्यावर त्यांनी मला सांगितले की, मी तुम्हाला आमंत्रित करणार नाही, तुम्ही स्वतः या. तुम्ही नक्की या.’

जवळजवळ 2 वर्षे कर्करोगाशी लढाई केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर ते न्यूयॉर्कमध्ये उपचारासाठी गेले. तेथून उपचार घेतल्यानंतर ते भारतात परत आले होते. पण, त्यांची तब्येत पुन्हा खालावली होती.

(Juhi Chawla Share Rishi Kapoor memories from last film set)

हेही वाचा :

Dil De Diya Teaser : दिशा पाटनीसोडून जॅकलीन फर्नांडिससोबत सलमानचा रोमान्स, पाहा नव्या गाण्याचा टीझर!

Jivalaga : प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा तडका, ‘जिवलगा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Non Stop LIVE Update
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.