‘कहाणी घर घर की’ फेम अभिनेत्रीचं निधन; टीव्ही विश्वाला मोठा धक्का
'कहाणी घर घर की' मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं निधन; ब्रेन स्ट्रोकमुळे अभिनेत्रीने घेतला अखेरचा श्वास
Rajeeta Kochhar passed away : 2022 वर्षाच्या अखेरीस दिग्गज अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतल्यामुळे कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. ‘कहाणी घर घर की’ फेम अभिनेत्री रजिता कोचर यांचं 23 डिसेंबर रोजी निधन झालं आहे. त्या 70 वर्षांच्या होत्या. रजिता कोचर यांनी अनेक मालिका आणि हिंदी सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. पण आता त्यांच्या निधनामुळे फिल्म इंडस्ट्री आणि चाहत्यांच्या मनात मोठ पोकळी निर्माण झालं आहे. रजिता यांनी अभिनेत्री कंगना रानौतच्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटात देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती.
रचिता कोचर यांच निधन
ब्रेन स्ट्रोकमुळे रचिता यांचं निधन झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ब्रेन स्ट्रोक शिवाय रजिता यांना अर्धांगवायूचा त्रास देखील होत होता. मध्यंतरी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. पण 20 डिसेंबर रोजी त्यांना श्वास घेण्यास त्रास होवू लागल्यामुळे रजिता यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
रजिता रुग्णालयात व्हेंटिलेटरवर होत्या. पण आजाराशी झुंज देत असताना त्यांचं 23 डिसेंबर रोजी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत.
रजिता यांनी अनेक मालिका आणि सिनेमांध्ये काम केलं. पण ‘कहाणी घर घर की’ मालिकेतून रजिता यांना विशेष लोकप्रियता मिळाली. ‘कहाणी घर घर की’ या मालिके शिवाय त्यांनी ‘हातिम’, ‘कवच’ या मालिकांमध्ये देखील मुख्य भूमिका साकारली.
पण आजही ‘कहाणी घर घर की’ मालिकेतील दादी बुवा म्हणून आजही त्यांची ओळख आहे. आजही त्यांच्या अभिनयाची चर्चा सर्वत्र रंगत असते. महत्त्वाचं म्हणजे वयाच्या 70 व्या वर्षी देखील त्या फिट होत्या. पण त्यांच्या निधनामुळे सिनेविश्वाला मोठा धक्का बसला आहे.