Video: दीपिका, आलियाचं नाव निघालं अन् कंगनाला मिर्च्या झोंबल्या, शेवटी सवाल विचारणाऱ्यांचे माईक बंद केले, काय घडलं?

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत (Kangana Ranaut) आता चित्रपटानंतर लवकरच ओटीटीवर (ott) पदार्पण करणार आहे. लवकरच तिचा एक रिअ‍ॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र या शो संदर्भात विचारलेल्या एका प्रश्नावर कंगनाने चांगलाच संताप व्यक्त केला आहे.

Video: दीपिका, आलियाचं नाव निघालं अन् कंगनाला मिर्च्या झोंबल्या, शेवटी सवाल विचारणाऱ्यांचे माईक बंद केले, काय घडलं?
कंगना राणौत
Follow us
| Updated on: Feb 17, 2022 | 7:12 PM

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत (Kangana Ranaut) आता चित्रपटानंतर लवकरच ओटीटीवर (ott) पदार्पण करणार आहे. ती एका रिअ‍ॅलिटी शोचे सूत्रसंचालन करणार आहे. . रिपोर्टनुसार, हा शो डेटिंग आणि रोमान्सवर आधारित आहे. कंगना करणार असलेल्या या शोची प्रेरणा ही लोकप्रिय अमेरिकन रिअ‍ॅलिटी डेटिंग शो टेम्पटेशन आयलंडपासून घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या शोचे प्रमोशन करण्यासाठी कंगनला ‘लॉकअप’ (Lockup) या रिअ‍ॅलिटी शोमध्ये अमंत्रित करण्यात आले होते. मात्र चर्चेदरम्यान कंगनाचा पारा चांगलाच वाढलेल्या दिसला. या शोदरम्यान तिला विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर ती चांगलीच भडकली. आगामी काळात ‘गंगूबाई’ सारखे अनेक चित्रपट रिलिज होणार आहेत. तेव्हा तुझ्या या शोची स्पर्धा कोणासोबत असेल असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना कंगनाने नाराजी व्यक्त केली.

शोमध्ये नेमकं काय झालं?

आपल्या आगामी रिअ‍ॅलिटी शोचे प्रमोशन करण्यासाठी कंगना राणौत लॉकप या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिला विचारण्यात आले की आगामी काळात अनेक मोठे चित्रपट रिलिज होणार आहेत. तुझ्या या रिअ‍ॅलिटी शोची स्पर्धा कोणासोबत असेल, तसेच यावेळी दीपिका आणि अलियाच्या नावाचा देखील उल्लेख झाला. हा प्रश्न ऐकूण कंगना चांगलीच भडकली. तिने प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला चांगलेच सुणावले. त्यांच्या चित्रपटाचे ते प्रमोशन करत आहेत. आपण इथे माझा शो प्रमोट करण्यासाठी सहभागी झाला आहात. मग आपण वारंवार त्यांच्या चित्रपटांना प्रमोट करण्याचा का प्रयत्न करत आहात असा सवाल कंगनाने केला आहे.

‘माझ्या शोचा चित्रपटांशी काहीही संबंध नाही’

कंगना पुढे बोलताना म्हणाली की, त्यांच्या चित्रपटांचा आणि माझ्या या शोचा एकोंएकांशी काहीच संबंध नाही. मग तुम्ही त्यांच्या चित्रपटांबाबतचे प्रश्न या शोमध्ये का प्लांट करत आहात. त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी त्यांची टीम आहे. कृपया तुम्ही प्रमोशन करू नका असे म्हणत कंगनाने संताप व्यक्त केला आहे. दरम्यान कंगना लवकरच ओटीटीवर पदार्पन करणार आहे. ती एका रिऑलिटी शोचे सूत्रसंचालन करणार असून, या शोची प्रेरणा अमेरिकन रिअ‍ॅलिटी डेटिंग शो टेम्पटेशन आयलंडपासून घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. संबंधित टीव्ही चॅनलकडून हा व्हिडीओ प्रसारित करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

आय अ‍ॅम डेड इनसाईड, दीप सिद्धूच्या मृत्यूनंतर गर्लफ्रेंड रीना रॉयची भावनिक पोस्ट

Bappi Lahiri Funeral Highlights : मुलगा बप्पाने दिली मुखाग्नी; बप्पीदा पंचतत्वात विलीन विलीन

2 दिवसानंतर फरहान शिबानीचं लग्न, खंडाळ्यातलं फार्म हाऊस सजवलं; मोजक्या लोकांना आमंत्रण

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.