Kangana Ranaut | कंगना रनौत मुंबईत दाखल, ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

मुंबईत येत आहे हिंमत असेल तर अडवून दाखवा असं खुलं आव्हान देणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत मुंबईत दाखल झाली.(Kangana Ranaut Coming Mumbai Live Update)

Kangana Ranaut | कंगना रनौत मुंबईत दाखल, ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र
Follow us
| Updated on: Sep 09, 2020 | 6:30 PM

मुंबई : शिवसेनेला मुंबई कुणाच्या बापाची नाही, मुंबईत येत आहे हिंमत असेल तर अडवून दाखवा असं खुलं आव्हान देणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत मुंबईत दाखल झाली. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर मागच्या गेटने कंगना राहत्या घराकडे रवाना झाली. कडेकोट पोलीस बंदोबस्तात कंगना विमानतळावरुन पाली हिल इथल्या घराकडे दाखल झाली. यानंतर कंगनाने ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली.  (Kangana Ranaut Coming Mumbai Live Update)

“उद्धव ठाकरे तुला काय वाटतं, तुम्ही फिल्म माफियासोबत माझं घरं तोडून फार मोठा बदला घेतला. आज माझं घरं तोडलं आहे. उद्या तुझा गर्व तुटेल,” अशी टीका बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने केली. यावेळी तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधला.

त्याशिवाय कंगनाने पालिकेने कारवाई केलेल्या ऑफिसचे व्हिडीओ ट्विटवर पोस्ट केले. “हा लोकशाहीचा मृत्यू,” असे कॅप्शन तिने प्रत्येक व्हिडीओला दिले आहे. जवळपास पाच व्हिडीओ तिने ट्वीट केलं आहे.

LIVE Updates :

[svt-event title=”घरी पोहोचल्यानंतर कंगनाचे नवे ट्विट” date=”09/09/2020,3:29PM” class=”svt-cd-green” ] घरी पोहोचल्यानंतर कंगनाचे नवे ट्विट, पालिकेने कारवाई केलेल्या ऑफिसाचा व्हिडीओ ट्विट, “हा लोकशाहीचा मृत्यू,” असे कॅप्शन देत व्हिडीओ ट्विट

[/svt-event]

[svt-event title=”कंगना रनौतच्या सर्व लाईव्ह अपडेट ” date=”09/09/2020,3:20PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event date=”09/09/2020,3:42PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कंगना रनौत खार इथल्या घरी दाखल” date=”09/09/2020,3:20PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

    • महत्वाच्या घडामोडी LIVE- कंगनाच्या कार्यालयावर हातोडा
  • अभिनेत्री कंगना रनौत मुंबईत दाखल, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन
  • कंगनाच्या विषयाला आपण अधिक महत्व देतोय, लोक सीरियस घेत नाहीत, आपणही त्याकडे गांभीर्याने पाहू नये, याकडे दुर्लक्ष करावे – शरद पवार
  • कंगनाच्या कार्यालयावरील BMC च्या कारवाईला स्थगिती, हायकोर्टाचे आदेश
  • कंगनाविरोधात विमानतळावर कोणतंही आंदोलन करु नका, शिवसेना नेतृत्वाचे कार्यकर्त्यांना आदेश
  • कार्यालयावरील बीएमसीच्या कारवाईवर कंगनाची आगपाखड, बीएमसी आणि महाराष्ट्र प्रशासनाचा उल्लेख बाबर म्हणून, तर स्वतःच्या कार्यालयाचा उल्लेख राम मंदिर
  • मी कधीच चुकीची नव्हते, मी मुंबईला पाकिस्तानव्याप्त काश्मीर का म्हणाले हे माझ्या शत्रुंनी वारंवार सिद्ध केलं : कंगना रनौत
  • माझ्यासाठी ही इमारत नाही राम मंदिर आहे, आज तिथं बाबर आलाय. आज पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होणार, राम मंदिर पुन्हा पडणार. पण बाबरने लक्षात ठेवावं की हे मंदिर पुन्हा निर्माण होणार : कंगना रनौत
  • महाराष्ट्र सरकार आणि त्यांचे गुंड माझ्या ऑफिसजवळ जमा झाले आहेत आणि ते बेकायदेशीरपणे तोडण्यासाठी तयार झाले आहेत, जे करायचं ते करा : कंगना रनौत
  • मला महाराष्ट्राने सर्वकाही दिलं, मीही शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला अशी मुलगी दिलीय जी स्त्री सन्मान आणि अस्मितेसाठी आपलं रक्तही देईल, जय महाराष्ट्र : कंगना रनौत
  • मी 12 वर्षांची असताना चंदीगडला आले, तेथून 16 व्या वर्षी मुंबईत आले. मुंबादेवीची इच्छा आहे तोच मुंबईत राहतो असं मित्रांनी सांगितलं. आम्ही सर्वांनी मुंबादेवीचं दर्शन घेतले, सर्व मित्र परतले, मला मुंबादेवीने तिच्याकडेच ठेऊन घेतलं : कंगना रनौत
  • मंडीहून चंदीगडला जाताना कंगनाने हमिरपूर जिल्ह्यातील एका मंदिरात थांबून दर्शन घेतलं
  • राणी लक्ष्मीबाई यांच्या धैर्य, शौर्य आणि बलिदानाला मी चित्रपटातून जगले आहे. मात्र, मला माझ्याच महाराष्ट्रात येण्यापासून रोखलं जात आहे. मी राणी लक्ष्मीबाई यांच्या पावलावर पाऊल टाकून घाबरणार नाही आणि झुकणारही नाही. चुकीच्या गोष्टींविरोधात नेहमी खुलेपणाने विरोध करेल. जय महाराष्ट्र, जय शिवाजी – कंगना रनौत
  • हिमाचल प्रदेशमधील मंडीहून चंदीगडपर्यंत रस्त्याने प्रवास, चंदीगडहून मुंबईपर्यंत विमान प्रवास, दुपारी 12.15 वाजता फ्लाईट

कंगना रनौतच्या दुसऱ्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला. यानंतर कंगना सकाळी रस्त्याने मंडीहून चंदीगढला जात आहे. त्यानंतर ती विमानाने चंदीगडहून मुंबईला येईल. आज दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी तिची फ्लाईट आहे. दरम्यान याआधी कंगनाचे कोरोना चाचणीसाठीच्या सॅम्पलमध्ये काही त्रुटी निघाल्या होत्या. त्यामुळे पुन्हा तिचे कोरोना चाचणीसाठीचे नमुने घेण्यात आले.

कंगना सीआरपीएफ आणि हिमाचल प्रदेश पोलिसांच्या सुरक्षेत मंडीतील आपल्या आई वडिलांच्या घरी होती. कंगनाने मागील काही दिवसांपासून शिवसेनेला अनेकदा आव्हान दिलं आहे. तसेच 9 सप्टेंबरला मुंबईल येत आहे, हिंमत असेल तर अडवून दाखवा असं खुलं आव्हानही दिलंय. यावर आक्रमक होत शिवसेने देखील तिला मुंबईत येऊन दाखवण्याचं आव्हान केलंय. त्यामुळे आज मुंबईत काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Kangana Ranaut Coming Mumbai Live Update)

दरम्यान, कंगनाच्या मुंबईतील ऑफिसमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी पालिकेकेडून नोटीस पाठवण्यात आली आहे. तर दुसरीकडे ती ड्रग्ज घेत असल्याचा आरोप झाला आहे. त्याशिवाय कंगनाविरोधात विधानसभेत हक्कभंग दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

कंगना ड्रग्ज घेत असल्याचा आरोप

अभिनेता सुशांत सिंह प्रकरणावरुन कंगनाने मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर शिवसेना तसेच इतर राजकीय पक्षांनी तिच्यावर टीका केली होती. नुकतचं कंगना ड्रग्ज घेत असल्याचा आरोप होत आहे. याबाबत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि सुनील प्रभू यांनी तक्रार दाखल होती. याची चौकशी मुंबई पोलिसांमार्फत केली जाणार आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

अभिनेता शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन याची एक मुलाखत सध्या व्हायरल होत आहे. यात कंगनाने त्याला कोकेन घेण्याचा आग्रह केल्याचा दावा केला आहे. आपण हॅश ट्राय केलं होतं. पण ते आवडलं नव्हतं. त्यामुळेच आपण कोकेन घेण्यास नकार दिला होता. कोकेन घेण्यास नकार दिल्यामुळे कंगनाचे आणि माझे कडाक्याचे भांडणही झालं होतं, असंही अध्ययन या मुलाखतीत म्हटलं आहे. या मुलाखतीच्या आधारे कंगनाची चौकशी केली जाणार आहे, असे अनिल देशमुखांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

कंगनाला होम क्वारंटाईन करणार, मुंबईच्या महापौरांनी नियम दाखवला

केंद्राचं देशातील समस्यांवर नव्हे, कंगनावर जास्त प्रेम, शिवसेनेचा मोदी सरकारला टोला

कंगनाची चौफेर कोंडी, विधानसभेत हक्कभंग, ड्रग्ज प्रकरणातही चौकशी होणार

संबंधित व्हिडीओ :

(Kangana Ranaut Coming Mumbai Live Update)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.