Stree 2 च्या कोट्यवधींच्या कमाईवर कंगना रनौतचं मोठं वक्तव्य, ‘टीमला शुभेच्छा, पण…’

Stree 2: 'स्त्री 2' सिनेमाने 2 दिवसांत पार केलाय 90 कोटींचा गल्ला... सिनेमाच्या यशावर कंगना रनौत यांचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या, 'टीमला शुभेच्छा, पण...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'स्त्री 2' सिनेमाची चर्चा...

Stree 2 च्या कोट्यवधींच्या कमाईवर कंगना रनौतचं मोठं वक्तव्य, 'टीमला शुभेच्छा, पण...'
Follow us
| Updated on: Aug 17, 2024 | 8:23 AM

अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव स्टारर कॉमेडी हॉरर ‘स्त्री 2’ सिनेमा चाहत्यांचं मनोरंजन करण्यास यशस्वी ठरला आहे. 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री 2’ सिनेमाने 2 दिवसांत 90 कोटी रुपयांचा गल्ला पार केला आहे. सिनेमा पाहाण्यासाठी चाहते सिनेमागृहात मोठी गर्दी करत आहेत. सर्वत्र सिनेमाची चर्चा सुरु असताना अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत यांनी सिनेमाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र कंगना यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर कंगना यांनी ‘स्त्री 2′ साठी खास पोस्ट लिहिली आहे. ”स्त्री 2′ सिनेमाने सर्व रेकॉर्ड मोडले आहे. संपूर्ण टीमला शुभेच्छा, पण सिनेमा खरा हिरो हा कायम दिग्दर्शक असतो. भारतात दिग्दर्शकांचं व्हायला हवं तसं कौतुक होत नाही. शिवाय सिनेमा हीट झाल्यानंतर देखील अधिक श्रेय दिग्दर्शकाला मिळत नाही. त्यामुळे तरुणांना लेखक किंवा दिग्दर्शक व्हायचं नसतं…’

‘सिनेमांमध्ये ज्या तरुणांना करियर करायचं आहे, त्यांची आवड फक्त अभिनयात आहे. मला जे तरुण भेटण्यासाठी येतात त्यांना अभिनेता किंवा अभिनेत्री व्हायचं असते. पण प्रत्येक जण अभिनेता – अभिनेत्री होण्याची स्वप्न रंगवत असेल तर, सिनेमे तयार कोण करेल? विचार करा…’ असं अभिनेत्री म्हणाली.

कंगना पुढे म्हणाली, ‘त्यामुळे अशा दिग्दर्शकांबद्दल वाचा जे तुमचं मनोरंजन करु शकतील, त्यासाठी मेहनत घेऊ शकतील. त्यांना फॉलो करा आणि त्यांच्या जीवनाबद्दल जाणून घ्या. त्यांचं कौतुक करा… प्रिय अमर कौशिक सर… बहुप्रतीक्षित ब्लॉकबस्टर सिनेमा देण्यासाठी आभार…’ सध्या सर्वत्र कंगनाच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव स्टारर कॉमेडी हॉरर ‘स्त्री 2’ सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाने पहिल्याच दिवसांत 75.5 कोटी रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी सिनेमाने 30 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. त्यामुळे सुट्ट्यांचा सिनेमाला मोठा फायदा होताना दिसत आहे. आता येत्या दिवसांमध्ये सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. सिनेमा 200 कोटी रुपयांचा गल्ला पार करु शकतो… असा अंदाज सिनेमा विश्लेषकांनी वर्तवला आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.