Kangana Ranaut | शाहरुख खान चित्रपटांचा देव? कंगना राणावत हिचे अत्यंत मोठे भाष्य, वाचा नेमके घडले काय?
शाहरुख खान हा त्याच्या जवान या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. शाहरुख खान याचा हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसतोय. शाहरुख खान याच्या या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. शाहरुख खान याच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Kangana Ranaut) याचा जवान हा चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे शाहरुख खान याचा जवान चित्रपट मोठा धमाका करताना दिसतोय. शाहरुख खान याने जोरदार पद्धतीने जवान चित्रपटाचे प्रमोशन केले. शाहरुख खान याच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल मोठे क्रेझ हे बघायला मिळाले. शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट (Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज झाला.
विशेष म्हणजे पठाण हा चित्रपट शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. शाहरुख खान हा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या जवान चित्रपटाचे प्रमोशन करत होता. शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट काल रिलीज झाला. पहिल्याच दिवशी चित्रपटाने कमाईमध्ये अनेक रेकाॅर्ड तोडले आहेत.
पुढील काही दिवसांमध्ये चित्रपट मोठा धमाका करेल असेही सांगितले जात आहे. या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा नक्कीच आहेत. शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाला चांगले रिव्ह्यू मिळताना दिसत आहेत. इतकेच नाही तर आता कंगना राणावत हिने देखील शाहरुख खान याच्या जवान चित्रपटासाठी एक पोस्ट शेअर केलीये. विशेष बाब म्हणजे शाहरुख याच्या जवान चित्रपटाचे काैतुक करताना कंगना राणावत ही दिसत आहे.
आता कंगना राणावत हिची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. इतकेच नाही तर कंगना राणावत हिने चक्क शाहरुख खान याला देव देखील म्हटले आहे. कंगना राणावत हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, मला तो काळ आजही आठवतो की, लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे आणि त्याची खिल्ली उडवायचे. मोठा संघर्ष त्याने नक्कीच केला आहे. शाहरुख खान हा सिनेमाचा देव आहे.
किंग खान, तुझ्या समर्पणाला मेहनतीला मी सलाम करते. इतकेच नाही तर यासोबतच कंगना राणावत हिने संपूर्ण जवान टिमचे अभिनंदन हे केले आहे. शाहरुख खान याच्यासाठी कंगना राणावत हिने मोठी पोस्ट लिहिली आहे. ही गोष्ट फार कमी वेळा बघायला मिळते की, कंगना राणावत ही कोणत्यातरी बाॅलिवूड चित्रपटाचे काैतुक करते.
कंगना राणावत हिने ही पोस्ट इंस्टा स्टोरीवर शेअर केली आहे. नुकताच एका पाकिस्तानी अभिनेत्रीने कंगना राणावत हिच्यावर मोठी टिका केली. इतकेच नाही तर त्या अभिनेत्रीने कंगना राणावत हिच्या कानाखाली मारण्याची इच्छा असल्याचे देखील थेट म्हटले आहे. यावर कंगना राणावत काय प्रतिक्रिया देते याकडे चाहत्यांच्या नजरा आहेत.