Kangana Ranaut | गेल्या 12 महिन्यांपासून कंगना रनौत सतत आजारी; चाहत्यांकडून काळजी व्यक्त

अभिनेत्री कंगना रनौतची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या आजारपणाविषयी खुलासा केला आहे. गेल्या 12 महिन्यांपासून सतत आजारी असल्याचं तिने म्हटलंय. कंगनाच्या या पोस्टवर चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे.

Kangana Ranaut | गेल्या 12 महिन्यांपासून कंगना रनौत सतत आजारी; चाहत्यांकडून काळजी व्यक्त
Kangana RanautImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 19, 2023 | 3:28 PM

मुंबई | 19 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री कंगना रनौतची तब्येत गेल्या काही महिन्यांपासून ठीक नाही. याबद्दलची माहिती खुद्द तिने सोशल मीडियावर पोस्ट लिहित दिली. सोमवारी कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहिली. यात तिने तिच्या आजारपणाविषयी खुलासा केला. त्याचसोबत तिने असंही म्हटलंय की, प्रत्येकाला कधी ना कधी कमजोर आणि निराश झाल्यासारखं वाटतं. कंगनाची ही स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये तिने चाहत्यांना उत्सवानिमित्त शुभेच्छादेखील दिल्या आहेत.

कंगनाची पोस्ट-

कंगनाने लिहिलं, ‘गेल्या बारा महिन्यांपासून मला डेंग्यु, कोविड, डेल्टा, कोविड-ओमिक्रॉन आणि कोविड प्लस स्वाइन फ्लू हे सर्वकाही झालंय. मी सतत आजारी आहे. मला इतकंच म्हणायचं आहे की प्रत्येकाला कधी ना कधी खचल्यासारखं वाटतं. कमजोर पडल्यासारखं आणि निराश झाल्यासारखं वाटतं. बॅटमॅनसारख्या लोकांनाही असं वाटू शकतं. चला चालत राहुयात, पुढे जात राहुयात. सर्वांना उत्सवानिमित्त शुभेच्छा.’ कंगनाच्या या पोस्टवर चाहत्यांनी काळजी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

कंगना सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असते. विविध मुद्द्यांवर ती मोकळेपणे व्यक्त होते. सध्या तिच्या या पोस्टमुळे चाहत्यांनी कंगनाच्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त केली आहे. कंगना लवकरच ‘तेजस’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती एअरफोर्स पायलटच्या भूमिकेत आहे. येत्या 20 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती ‘चंद्रमुखी 2’मध्येही झळकणार आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. पी. वासू यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर तमिळ हॉरर कॉमेडी चित्रपट ‘चंद्रमुखी’चा दुसरा भाग आहे.

काही दिवसांपूर्वी कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित राष्ट्रीय पुरस्काराबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तिच्या ‘थलायवी’ या चित्रपटाला एकही राष्ट्रीय पुरस्कार न मिळाल्याने तिने ही पोस्ट लिहिली होती.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.