सुभाषचंद्र बोस यांना देशाचे पहिले पंतप्रधान म्हटल्याने कंगनाची उडवली खिल्ली; प्रकाश राज म्हणाले ‘जोकर’
भाजपने हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगनाला उमेदवारी दिल्यानंतर राज्यातील एकमेकांशी भांडणारे काँग्रेसचे नेते एकत्र आले आहेत. इतकंच नव्हे तर हिमाचल प्रदेशातील दोन मोठ्या राजघराण्यांचीही कंगनाविरोधात छुपी एकजूट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बॉलिवूड इंडस्ट्रीची ‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन’ अर्थात अभिनेत्री कंगना राणौत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. हिमाचल प्रदेशमधील मंडी या मतदारसंघातून ती भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवतेय. तिकिट मिळताच कंगनाने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. तिने मंडीमध्ये काही दिवसांपूर्वी रोड शोसुद्धा केला होता. आता नुकताच कंगनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ती सुभाषचंद्र बोस यांना देशाचे पहिले पंतप्रधान असल्याचं म्हणतेय. या व्हिडीओवरून कंगनाला चांगलंच ट्रोल केलं जातंय. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनीसुद्धा कंगना आणि भाजपाची खिल्ली उडवली आहे.
कंगनाचा व्हायरल होणारा हा व्हिडीओ ‘टाइम्स नाऊ समिट’मधील आहे. यामध्ये कंगना म्हणते, “आधी मला ही गोष्ट स्पष्ट करा, जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा जे भारताचे पहिले पंतप्रधान होते सुभाषचंद्र बोस, ते कुठे गेले?” हे ऐकल्यानंतर निवेदिका कंगनाला सांगते की सुभाषचंद्र बोस हे पंतप्रधान नव्हते. मुलाखतीतला हा क्लिप सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. त्यावर नेटकरी आणि विरोधक विविध प्रतिक्रिया देत आहेत.
प्रकाश राज यांची पोस्ट
Clowns of Supreme Joker’s Party… what a Disgrace..#justasking .. ಮಹಾಪ್ರಭುವಿನ ಆಸ್ಥಾನ ವಿದೂಷಕರು… https://t.co/Q17wagFd0M
— Prakash Raj (@prakashraaj) April 4, 2024
‘सिंघम’ या चित्रपटात जयकांत शिक्रेची भूमिका साकारणारे अभिनेते प्रकाश राज नेहमीच भाजपविरोधी वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यामुळे कंगनाच्या या वक्तव्यावरून त्यांनी भाजपची खिल्ली उडवण्याची संधी सोडली नाही. त्यांनी लिहिलं, ‘सुप्रीम जोकर पार्टीची जोकर.. किती अपमान आहे.’ तर नेटकरीसुद्धा कंगनाला ट्रोल करत आहेत. कंगना कोणत्या शाळेतून शिकली, असा सवाल काहींनी केला. तर असं ज्ञान असलेले लोक निवडणूक लढवत आहेत, असा टोला नेटकऱ्यांनी लगावला आहे.
काहींनी कंगनाची तुलना अभिनेत्री आलिया भट्टशीही केली आहे. आलियाला अनेकदा तिच्या आयक्यूवरून (IQ) ट्रोल केलं जातं. सर्वसामान्य माहिती तिला नसल्याची टीका नेटकरी करतात. आता जेव्हा कंगनाच्या तोंडून असं वक्तव्य निघालं, तेव्हा तिचीसुद्धा तुलना आलियाशी केली जात आहे. ‘आलियाने वयाच्या 19 व्या वर्षी टीव्हीवर असंच काहीतरी म्हटलं होतं. पण ही तर जवळपास 40 वर्षांची असून अशी चूक करतेय’, असं एका युजनरे म्हटलंय.