खासदार झाल्यानंतर कंगना रनौत यांची मोठी घोषणा, चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण
Kangana Ranaut Emergency Release Date Out : कंगना रनौत यांच्या एका पोस्टमुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण, खासदार झाल्यानंतर अभिनेत्रीकडून मोठी घोषणा... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना यांच्या आगामी सिनेमाची चर्चा...
बॉलीवूड अभिनेत्री आणि लोकसभा खासदार कंगना रनौत यांनी त्यांच्या करिअरमध्ये एक मोठा टप्पा गाठला आहे. 2024 लोकसभेची निवडणूक लढवत कंगना यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. नुकतीच त्यांनी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली असून खासदार झाल्यानंतर मोठी घोषणा केली आहे. कंगना यांनी बहुप्रतीक्षीत ‘इमर्जन्सी’ सिनेमाच्या प्रदर्शनाची घोषणा केली आहे.
‘इमर्जन्सी’ सिनेमा आता लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सांगायचं झालं तर, सिनेमाचं दिग्दर्शन आणि निर्मिती खुद्द कंगना यांनी केली आहे. कंगना रनौत यांनी सोशल मीडियावर ‘इमर्जन्सी’ सिनेमाबद्दल मोठी अपडेट शेअर केली आहे. सध्या सर्वत्र त्यांच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.
View this post on Instagram
‘इमर्जन्सी’ सिनेमा पोस्टर शेअर करत कंगना यांनी कॅप्शनमध्ये, ‘देशाच्या स्वातंत्र्याच्या पहिल्या 50 वर्षांची कथा… जो भारताचा सर्वात काळा काळा होता. ‘इमर्जन्सी’ सिनेमा 6 सप्टेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त भागाची स्फोटक कथा जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे… चाहते देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.
‘इमर्जन्सी’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमा अनेक दिवसांपासून थिएटरमध्ये आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. दोनदा सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता अखेर 6 सप्टेंबर 2024 रोजी सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
बॉलिवूड क्वीन सध्या आगामी ‘इमर्जन्सी’ सिनमामुळे चर्चेत आहेत, जो लवकरच प्रदर्शित होणार आहे.अनेक भूमिका साकारत चाहत्यांच्या भेटीस आलेल्या कंगना आता ‘इमर्जन्सी’ सिनमात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. सिनेमात श्रेयस तळपदे, अनुपम खेर, महिमा चौधरी आणि पुपूल जयकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.