AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kangana Ranaut | कंगना रनौतला कोरोनाची लागण, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती

बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ म्हणजेच अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) देखील कोरोनाच्या विळख्यात अडकली आहे. कंगनाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

Kangana Ranaut | कंगना रनौतला कोरोनाची लागण, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
कंगना रनौत
| Updated on: May 08, 2021 | 11:09 AM
Share

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सध्या जगभरात पुन्हा एकदा हाहाकार माजला आहे. देशात सतत वाढत असलेल्या कोरोना केसेस दरम्यान आता बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ म्हणजेच अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) देखील कोरोनाच्या विळख्यात अडकली आहे. कंगनाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तिने स्वतः ही माहिती सोशल मीडियाच्या माधमातून आपल्या चाहत्यांना दिली आहे. आपला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच तिने स्वत:ला क्वारंटाईन केले आहे. सध्या ती डॉक्टरांच्या सल्ल्याने घरातच उपचार घेत आहे (Kangana Ranaut tested corona positive).

कंगना रनौतने ही माहिती आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांसोबत शेअर केली. तिने एक फोटो शेअर केले आहे, ज्यामध्ये ती ध्यानधारणा करताना दिसत आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘मागील काही दिवसांपासून मला खूप थकवा आला होता आणि माझे डोळे देखील जळजळत होते. हिमाचलला जाण्यापूर्वी मी काल माझी कोरोना टेस्ट करून घेतली होती आणि आज त्याचा निकाल आला आहे. मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. हे काळातच मी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे. हा विषाणू माझ्या शरीरात आहे, हे मला काहीच माहिती नव्हते. आता मला माहित आहे की, मी यातून लवकरच पूर्णपणे बरी होईन.’

पाहा कंगनाची पोस्ट

कंगनाचे खाते निलंबित

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार स्थापन झाल्यापासून कंगना टीएमसीविरोधात विविध प्रकारचे ट्विट करत होती. भाजपला पाठिंबा देत कंगना उघडपणे टीएमसीवर निशाणा साधत होते. गँगरेपचा आरोप करत कंगनाने टीएमसीविरोधात ट्वीट केले होते, त्यानंतर ट्विटरने तिचे खाते निलंबित केले गेले होते. कंगनाचे खाते आता कायमचे निलंबित करण्यात आले आहे (Kangana Ranaut tested corona positive) .

कंगनाची प्रतिक्रिया

आपले खाते निलंबित झाल्यावर कंगनाने आपला व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला. व्हिडीओमध्ये कंगना म्हणाली होती की, ट्विटरने माझे म्हणणे सुरुवातीपासूनच खरे केले आहे की, ते सुरुवातीपासूनच अमेरिकन आहेत. माझ्याकडे अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत जिथे मी आवाज उठवू शकते. याशिवाय मी सिनेमाद्वारेही माझा मुद्दा सिद्ध करेन.

‘थलायवी’मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

कंगनाच्या व्यावसायिक आयुष्याविषयी बोलायचे तर, ती लवकरच ‘थलायवी’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती दिवंगत नेत्या जयललिता यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता, जो खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता प्रत्येकजण चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत.

(Kangana Ranaut tested corona positive)

हेही वाचा :

पाकिस्तान सरकारची कारवाई, दिलीपकुमार-राज कपूर यांच्या हवेली मालकांना अखेरची नोटीस!

Ranbir Kapoor | तब्बल 17 वर्षांनी प्रदर्शित झाला रणबीर कपूरचा पहिला चित्रपट, ऑस्करमध्येही मिळाले होते नामांकन!

हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.