“हा माझा सर्वात आवडता फोटो, यात माझ्या आयुष्याला मिळालेली कलाटणी”, कंगना रनौतचं नवं ट्वीट

अभिनेत्री कंगना रनौतने आपल्या नव्या ट्वीटमध्ये तिच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या एका क्षणाविषयी माहिती दिली (Kangana Ranaut tweet her most favourite photo).

हा माझा सर्वात आवडता फोटो, यात माझ्या आयुष्याला मिळालेली कलाटणी, कंगना रनौतचं नवं ट्वीट
Follow us
| Updated on: Sep 10, 2020 | 8:34 AM

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतने आपल्या कार्यालयावरील कारवाईनंतर ट्वीटच्या मालिकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यानंतर आता तिने आपल्या नव्या ट्वीटमध्ये तिच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या एका क्षणाविषयी माहिती दिली (Kangana Ranaut tweet her most favourite photo). या ट्वीटमध्ये तिने इशा योगा सेंटरमधील तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. तसेच हा आपला सर्वाधिक आवडता फोटो असल्याचं सांगत यात तिच्या आयुष्याला मिळालेली कलाटणी सुंदररित्या दिसत असल्याचं तिने नमूद केलं आहे.

कंगना म्हणाली, “हा माझा सर्वात आवडता फोटो आहे. हा माझ्या इशा योग सेंटरमध्ये काढण्यात आला. त्यावेळी काहीही ठरलेलं नव्हतं, सहजपणे हा फोटो काढला गेला. मात्र, यात माझ्या आयुष्याला मिळालेली कलाटणी सुंदरपणे स्मित हास्यासह दिसत आहे.”

हेही वाचा : Sharad Pawar | कंगनाला आपण अधिक महत्त्व देतोय, तिच्याकडे दुर्लक्ष करावे – शरद पवार

दरम्यान, याआधी कंगनाने केलेल्या ट्वीटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बीएमसी आणि बॉलिवूडवर सडकून टीका केली. ती म्हणाली, “मी माझ्या मुंबईत आहे, माझ्या घरी आहे. माझ्यावर हल्ला झाला तोही पाठीमागून जेव्हा मी विमान प्रवासात होते. माझ्या शत्रूंमध्ये समोरासमोर नोटीस देण्याची अथवा हल्ला करण्याची हिंमत नाही पाहून चांगलं वाटलं. अनेक लोक माझ्या नुकसानीवर दुःखी आहेत आणि काळजी व्यक्त करत आहेत. मी त्यांच्या प्रेम आणि आशिर्वादासाठी त्यांचे आभार मानते.”

“फॅन्सी स्त्रीवादी, बुलिवूड अॅक्टिव्हीस्ट, कँडल मार्च काढणारे गट आणि पुरस्कार परत करणारी गँग यांनी उच्च न्यायालयाने नोंदवल्याप्रमाणे महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा खुलेआमपणे खून होतोय यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. तुम्ही छान केलं, तुम्ही मला नेहमीच योग्य ठरवलं आहे. मी तुमच्याशी जशी वागली तुम्ही त्याच पात्रतेचे आहात,” असंही ट्वीट कंगनाने केलं. यात तिने बॉलिवूडचा उल्लेख बुलिवूड करत टोला लगावला. तसेच आपल्यावरील अन्यायाविरुद्ध न बोलल्याने टीका केली.

संबंधित बातम्या :

उद्धव ठाकरे, आज माझं घर तोडलं, उद्या तुझा गर्व तुटेल, कंगनाकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख

Kangana Ranaut | “महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची वेळ आली आहे”, कंगनाची राजकीय खेळी?

संजय राऊतांच्या खासदारकीचा राजीनामा घ्या, नवनीत राणांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

संबंधित व्हिडीओ : 

Kangana Ranaut tweet her most favourite photo

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....