गोव्यात ट्रॅम्पोलिनवर खेळताना अभिनेत्याचा तोल घसरला; मणक्याला दुखापत झाल्याने बेंगळुरूला केलं एअरलिफ्ट

दिगंत त्याच्या कुटुंबीयांसोबत गोव्याला व्हेकेशनसाठी गेला होता. मात्र दुखापतीनंतर त्याला ताबडतोब बेंगळुरूला एअरलिफ्ट करण्यात आलं. मंगळवारी दिगंतला एअरलिफ्ट करून बेंगळुरूमधील हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेड एअरपोर्टवर आणण्यात आलं.

गोव्यात ट्रॅम्पोलिनवर खेळताना अभिनेत्याचा तोल घसरला; मणक्याला दुखापत झाल्याने बेंगळुरूला केलं एअरलिफ्ट
Kannada actor DiganthImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 10:22 AM

गोव्यात ट्रॅम्पोलिनवर (trampoline) खेळताना पडल्याने कन्नड अभिनेता दिगंतच्या (Diganth) मणक्याला (cervical spine injury) दुखापत झाली. दिगंत त्याच्या कुटुंबीयांसोबत गोव्याला व्हेकेशनसाठी गेला होता. मात्र दुखापतीनंतर त्याला ताबडतोब बेंगळुरूला एअरलिफ्ट करण्यात आलं. मंगळवारी दिगंतला एअरलिफ्ट करून बेंगळुरूमधील हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेड एअरपोर्टवर आणण्यात आलं. तिथून त्याला मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दिगंतला सोमवारी गोव्यातील एका रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्या रुग्णालयात एमआरआय केलं असता त्याच्या मणक्याला दुखापत झाल्याचं निदान झालं. दिगंतवर ताबडतोब शस्त्रक्रियेची गरज असल्याने त्याला बेंगळुरूला एअरलिफ्ट करण्यात आलं. गोव्यातील डॉक्टर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यास तयार होते, मात्र दिगंतने बेंगळुरूला शस्त्रक्रिया करण्याचा आग्रह केला. यावेळी त्याच्यासोबत पत्नी ऐंद्रिता रेसुद्धा होती.

अपघातानंतर गोव्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाने दिगंथला बेंगळुरूला नेण्यासाठी तातडीने एअरलिफ्ट करण्याची विनंती करण्याची विनंतीही रुग्णालयाला केली होती. द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना मणिपाल हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक स्पाइन सर्जन डॉ. सनी कामत म्हणाले, “ट्रॅम्पोलिनवरून पडल्यानंतर दिगंतच्या मानेच्या मणक्याला दुखापत झाली. त्यांना आमच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. गंभीर काहीही नाही. दिगंतला बेंगळुरूमध्ये उपचार व्हावेत अशी इच्छा होती. त्याच्यावर शस्त्रक्रिया आवश्यक असल्याने ती करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान त्याचे कुटुंबीय उपस्थित राहावे अशी त्याची इच्छा होती म्हणून त्याला गोव्याहून बेंगळुरूला विमानाने आणण्यात आलं.”

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

बेंगळुरूच्या मणिपाल हॉस्पिटलने त्यांच्या निवेदनात म्हटलं “दिगंत मणिपाल हॉस्पिटलमध्ये दुपारी साडेचार वाजता पोहोचले. डॉ विद्याधर एस हे सध्या त्याच्या आरोग्यावर लक्ष ठेवून आहेत. दोन दिवसांपूर्वी गोव्यात ट्रॅम्पोलिनवर खेळताना त्याला दुखापत झाली होती.” फेब्रुवारी 2016 मध्ये दिगंतच्या उजव्या डोळ्याला दुखापत झाली होती. ‘टिकिट टू बॉलिवूड’ या हिंदी चित्रपटाच्या सेटवर त्याला दुखापत झाली होती.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.