Kantara: ‘कांतारा ‘ फेम अभिनेत्याने उडवली यशच्या KGF 2 ची खिल्ली; म्हणाला “केजीएफ पाहण्यापेक्षा मी..”
'कांतारा'मधील अभिनेत्याची केजीएफ 2 वर टीका, सुपरहिट चित्रपटाच्या कथेबद्दल म्हणाला असं काही, ज्यामुळे भडकले यशचे चाहते
![Kantara: 'कांतारा ' फेम अभिनेत्याने उडवली यशच्या KGF 2 ची खिल्ली; म्हणाला केजीएफ पाहण्यापेक्षा मी.. Kantara: 'कांतारा ' फेम अभिनेत्याने उडवली यशच्या KGF 2 ची खिल्ली; म्हणाला केजीएफ पाहण्यापेक्षा मी..](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/01/10131430/Kantara-and-KGF-2.jpg?w=1280)
मुंबई: ब्लॉकबस्टर चित्रपट ‘कांतारा’मध्ये वन अधिकाऱ्याची भूमिका साकारणारा अभिनेता किशोर कुमार त्याच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखला जातो. यामुळे अनेकदा तो अडचणीतही आला आहे. नुकताच त्याचा ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा त्याची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. किशोरने सुपरहिट चित्रपट ‘KGF 2’ला बालिश म्हटलं आहे.
कांतारा आणि केजीएफ 2 हे 2022 मधील सुपरहिट चित्रपट आहेत. एकीकडे केजीएफच्या यशला मोठा चाहतावर्ग मिळाला, तर दुसरीकडे कांताराच्या अनोख्या कथेचं कौतुक झालं. या दोन्ही कन्नड चित्रपटांना ‘आयकॉनिक’ म्हटलं गेलं आहे. मात्र किशोर या गोष्टीशी सहमत नाही.
“केजीएफ 2 बघण्यापेक्षा मी..”
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत किशोरने ‘केजीएफ 2’च्या कथेला डोकं नसलेली कथा असल्याचं म्हटलंय. “मला माहित नाही की बरोबर आहे की चुकीचं, मात्र मी केजीएफ 2 हा चित्रपट पाहिला नाही. हा माझ्या टाईपचा चित्रपट नाही. ही एक पर्सनल चॉईस आहे. मी केजीएफ पाहण्यापेक्षा एखादा छोट्या बजेटचा चित्रपट पाहीन, जो हिट झाला नसेल पण एखादा गंभीर विषय त्यात मांडला असेल, ज्याची कथा डोकं नसलेली वाटणार नाही,” असं तो म्हणाला.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/01/03143750/Rishabh-Pant-and-Urvashi.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/01/09181209/Ved-movie-1.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/01/09173605/Swara-Bhasker.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/01/09170903/Sunil-Grover.jpg)
यशने केलं होतं ‘कांतारा’चं कौतुक
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच केजीएफ स्टार यशने कांताराचं कौतुक केलं होतं. एका मुलाखतीत कांतारा हा यशचा चित्रपट असल्याचं चुकून म्हटलं गेलं होतं. मात्र नंतर ही चूक सुधारत ती व्यक्ती म्हणाली, “माफ करा तुमचा नाही तर कन्नड चित्रपट”. यावर मुलाखत घेणाऱ्याला मध्येच थांबवत यश म्हणाला, “सर कांतारा हा माझाच चित्रपट आहे. तुम्ही म्हणालात की तो माझा नाही, पण तो चित्रपट माझाच आहे. कारण यशसुद्धा कन्नड चित्रपटसृष्टीचा आहे, म्हणजेच तो संपूर्ण कन्नड चित्रपटसृष्टीचं प्रतिनिधित्व करतो.” यशच्या या वक्तव्याने चाहत्यांची मनं जिंकली होती.