AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kapil Dev : श्रीमंत महिलेला पाहाताच कपिल देव यांनी सोडली ‘या’ अभिनेत्रीची साथ, तेव्हा नक्की झालं तरी काय?

Kapil Dev : 'या' अभिनेत्रीसोबत सर्वत्र रंगल्या होत्या कपिल देव यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा... पण श्रीमंत आणि व्यवसायीक महिलेला समोर पाहाताच...; सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कपिल देव यांच्या खासगी आयुष्याची चर्चा, 'ती' अभिनेत्री नक्की होती तरी कोण?

Kapil Dev : श्रीमंत महिलेला पाहाताच कपिल देव यांनी सोडली 'या' अभिनेत्रीची साथ, तेव्हा नक्की झालं तरी काय?
Follow us
| Updated on: Dec 04, 2023 | 10:08 AM

मुंबई | 4 मुंबई 2023 : विराट कोहली, झहीर खान, हरभजन सिंग… यांच्याप्रमाणे अनेक क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींसोबत लग्न करत संसार थाटला… पण काही क्रिकेटर असे देखील आहेत, ज्यांनी बॉलिवूड अभिनेत्रींवर प्रेम तर केलं, पण त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अखेर अभिनेत्री आणि क्रिकेटपटूंनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. भारताला विश्वचषक जिंकून देणारे पहिले कर्णधार कपिल देव यांची कहाणी देखील अशीच आहे. कपिल देव एका अभिनेत्रीच्या प्रेमात होते. पण जेव्हा कपिल एका श्रीमंत आणि व्यवसायीक महिलेला भेटले तेव्हा त्यांनी अभिनेत्रीची साथ सोडली..

ज्या अभिनेत्रीसोबत कपिल देव यांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु होती, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सारिका ठाकुर आहे. सारिका ठाकुर एक प्रसिद्ध अभिनेत्री कॉस्ट्यूम डिजायनर आहेत. कपिल आणि सारिका यांची भेट एका पार्टीत झाली. पहिल्या भेटीनंतर कपिल देव आणि सारिका ठाकुर यांच्यामध्ये मैत्री झाली. मैत्रीचं कालातराने प्रेमात रुपांतर झालं.

कपिल देव आणि सारिका ठाकुर यांच्या नात्याची तुफान चर्चा रंगली होती. दोघे एकमेकांबद्दल गंभीर होते… असं देखील अनेकदा समोर आलं. पण तिसऱ्या व्यक्तीच्या एन्ट्रीनंतर कपिल देव आणि सारिका ठाकुर यांच्या नात्यात अडचणी आल्या. सारिका हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना कपिल देव यांची ओळख व्यवसायीक रोमा भाटिया यांच्यासोबत झाली

हे सुद्धा वाचा

कपिल देव पहिल्या नजरेतच रोमा भाटिया यांच्या प्रेमात पडले. रोमा भाटिया यांना देखील कपिल देव आवडू लागले होते. पण रोमा यांनी कपिल देव आणि सारिका ठाकुर यांच्या रिलेशनशिपबद्दल माहिती होतं. दरम्यान, कपिल देव आणि सारिका ठाकुर यांच्या लग्नाच्या चर्चांना जोर धरला होता…

सारिका हिच्यासोबत लग्नाच्या चर्चा रंगल्यानंतर कपिल देव यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार कपिल देव, सारिकाकडे गेले, अभिनेत्रीची माफी मागितली आणि ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला… अशा प्रकारे कपिल देव आणि सारिका ठाकुर यांच्या नात्याचा अंत झाला.

सारिका ठाकुर यांच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर 1980 मध्ये कपिल देव यांनी रोमा भाटिया यांच्यासोबत लग्न केलं. आज कपिल देव त्यांच्या खासगी आयुष्यात आनंदी आहेत. तर सारिका देखील त्यांच्या आयु्ष्यात आनंदी आहे. दोघांच्या ब्रेकअपला अनेक वर्ष झाली असली तरी, कपिल देव आणि सारिका ठाकुर यांच्या नात्याची चर्चा सर्वत्र रंगलेली असते.

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.