Shubhman Sara | शुभमन गिलबद्दल साराला विचारला प्रश्न; उत्तर ऐकून संशयाचं विश्वासात झालं रुपांतर

यावेळी कपिलने विकीला विचारलं की लग्नाच्या आधी तू कतरिना कैफला कुठे भेटायचा? त्यावर विकी हसत म्हणाला की "हे टॉप सीक्रेट आहे." यानंतर कपिल साराकडे वळला आणि तिला विचारलं की, "तू फिल्म इंडस्ट्रीतील एखाद्याला डेट करतेय की इंडस्ट्रीबाहेर कोणी निवडला आहेस?"

Shubhman Sara | शुभमन गिलबद्दल साराला विचारला प्रश्न; उत्तर ऐकून संशयाचं विश्वासात झालं रुपांतर
Sara Ali Khan and Shubhman GillImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 04, 2023 | 11:54 AM

मुंबई : अभिनेत्री सारा अली खान तिच्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. मुलाखतींमध्ये ती तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त होताना दिसते. याआधी ‘कॉफी विथ करण’मध्ये साराने अभिनेता कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यानंतर कार्तिक आणि सारा काही महिने रिलेशनशिपमध्येही होते. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. आता सारा अली खानचं नाव क्रिकेटर शुभमन गिलशी जोडलं जातंय. शुभमन हा सध्या ‘नॅशनल क्रश’ बनला आहे. अभिनेत्री सारासोबतच सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबतही त्याचं नाव जोडलं जातंय. आता डेटिंगच्या चर्चांबद्दल साराला ‘द कपिल शर्मा शो’मध्ये प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर तिने दिलेलं उत्तर ऐकून नेटकरीसुद्धा पेचात पडले आहेत.

शुभमन गिल आणि सारा अली खान यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तेव्हापासून या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा आहेत. गेल्या आठवड्यात सहअभिनेता विकी कौशलसोबत ती आयपीएलचा अंतिम सामना पाहण्यासाठी अहमदाबादला पोहोचली होती. आता ‘द कपिल शर्मा शो’मध्ये तिला डेटिंगबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

हे सुद्धा वाचा

सारा आणि विकी कौशल यांचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दोघं ‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर पोहोचले होते. यावेळी कपिलने विकीला विचारलं की लग्नाच्या आधी तू कतरिना कैफला कुठे भेटायचा? त्यावर विकी हसत म्हणाला की “हे टॉप सीक्रेट आहे.” यानंतर कपिल साराकडे वळला आणि तिला विचारलं की, “तू फिल्म इंडस्ट्रीतील एखाद्याला डेट करतेय की इंडस्ट्रीबाहेर कोणी निवडला आहेस?”

सारा तिच्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. मात्र यावेळी कपिलच्या प्रश्नावर तिने काहीच उत्तर दिलं नाही. हे पाहून कपिलनेही म्हटलं, “मी फक्त बाण सोडून पाहिला की निशाण्यावर लागतो की नाही.” यावर सारा म्हणाली, “हो पण आजकाल माझा कोणताच बाण निशाण्यावर लागत नाहीये.” हे ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो. शुभमनने इन्स्टाग्रामवर सारा अली खानला अनफॉलो केल्याचंही म्हटलं जात होतं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.