‘द कपिल शर्मा शो’मध्ये येणार पंतप्रधान मोदी? अभिनेत्याने निमंत्रण दिलेल्यानंतर मिळालेलं उत्तर म्हणजे…

‘द कपिल शर्मा शो' मध्ये अनेक दिग्गज व्यक्ती हजेरी लावतात; अभिनेत्याने शोमध्ये येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील निमंत्रण दिल्यानंतर...

‘द कपिल शर्मा शो’मध्ये येणार पंतप्रधान मोदी? अभिनेत्याने निमंत्रण दिलेल्यानंतर मिळालेलं उत्तर म्हणजे...
Follow us
| Updated on: Mar 12, 2023 | 10:14 AM

The Kapil Sharma Show : अभिनेता आणि विनोदवीर कपिल शर्मा कायम त्याच्या अभिनय आणि विनोदबुद्धीमुळे चर्चेत असतो. कपिलचे अनेक विनोदी व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. चाहत्यांना हासवणारा कपिल अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकला आहे. पण तरी देखील कपिलची चाहत्यांमध्ये असलेली क्रेझ कमी होत नाही. अभिनेता कायम चाहत्यांमध्ये कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. कपिल शर्मा यांच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये अनेक दिग्गज व्यक्ती हजेरी लावतात. कलाकार,क्रिकेटपटू इतर क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती कपिलच्या शोमध्ये हजेरी लावतात.

‘द कपिल शर्मा शो’मध्ये कोणी पाहुणा म्हणून आल्यानंतर कपिल त्याच्या विनोदी अंदाजात पाहुण्यांची फिरकी घेतो आणि चाहत्यांना हासवतो. नुकताच कपिल याने त्याच्या आयुष्यातील अनेक खासगी गोष्टींचा खुलासा एका कार्यक्रमात केला. या क्रर्यक्रमात कपिल याला “पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये येणार का?”, असा प्रश्न कपिलला विचारण्यात आला.

हे सुद्धा वाचा

या प्रश्नावर कपिल शर्मा म्हणाला, ‘जेव्हा मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो, तेव्हा मी त्यांना कपिल शर्मा शोमध्ये येण्याची विनंती केली. पंतप्रधान मोदी यांनी शोमध्ये येण्यास नकार दिला नाही. मोदी म्हणाले, माझे विरोधी सध्या खूप कॉमेडी करत आहेत. पण कधीतरी तुझ्या शोमध्ये नक्की येणार’ असं मोदी म्हणाले’

View this post on Instagram

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

कपिल शर्मा याच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झाल तर अभिनेता लवकरच ‘ज्विगाटो’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा सिनेमा १७ मार्चला प्रदर्शित होणार आहे. सिनेमात कपिल मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सध्या सर्वत्र कपिल याच्या आगामी सिनेमाची चर्चा रंगत आहे.

‘ज्विगाटो’ या सिनेमात कपिल शर्मा एका डिलिव्हरी बॉयची भूमिका साकरताना दिसणार आहे. सध्या कपिल सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. कपिल त्याच्या आगामी सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. त्यामुळे सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांच्या पसंतिस उतरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कपिल याआधी देखील मोठ्या पडद्यावर झळकला आहे. त्यामुळे आता पुन्हा त्याला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्या सर्वत्र कपिल याच्या आगामी सिनेमाची चर्चा आहे.

विनोदवीर कपिल शर्मा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतो. इन्स्टाग्रामवर कपिल याचे तब्बल ४४.१ मिलियन फॉलोअर्स आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कपिल कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.