करण जोहरसह हार्दिक पांड्या, केएल राहुल यांना राजस्थान कोर्टाकडून दिलासा, ‘कॉफी विथ करण’ संबंधित होता वाद

| Updated on: Aug 02, 2022 | 11:28 AM

या तिघांविरुद्ध लुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता लुनी पोलीस ठाण्याने आपला अंतिम अहवाल सादर करताना न्यायालयाला सांगितलं की, तिन्ही सेलिब्रिटींवर दाखल केलेले आरोप सिद्ध झालेले नाहीत.

करण जोहरसह हार्दिक पांड्या, केएल राहुल यांना राजस्थान कोर्टाकडून दिलासा, कॉफी विथ करण संबंधित होता वाद
करण जोहरसह हार्दिक पांड्या, केएल राहुल यांना राजस्थान कोर्टाकडून दिलासा
Image Credit source: Instagram
Follow us on

चित्रपट निर्माता-दिग्दर्सक करण जोहर (Karan Johar), भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि केएल राहुल (KL Rahul) यांना जोधपूर उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. या तिघांविरुद्ध लुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता लुनी पोलीस ठाण्याने आपला अंतिम अहवाल सादर करताना न्यायालयाला सांगितलं की, तिन्ही सेलिब्रिटींवर दाखल केलेले आरोप सिद्ध झालेले नाहीत. लुनी पोलीस ठाण्यात वकील डीआर मेघवाल यांनी क्रिकेटर हार्दिक पांड्या, केएल राहुल आणि करण जोहर यांच्याविरुद्ध एससी-एसटी कायद्याच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. याशिवाय ‘कॉफी विथ करण’ शोवर महिलांवर अश्लील आणि लैंगिक टिप्पणीचे आरोपही करण्यात आले होते.

हार्दिक पांड्याने उच्च न्यायालयात दाखल केली होती याचिका

हार्दिक पांड्याने राजस्थान हायकोर्टात त्याच्यावर दाखल करण्यात आलेला खटला रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. हार्दिक पांड्याच्या वकिलांनी सांगितलं की, “ज्या अकाऊंटवरून ट्विट करण्यात आलं, ते ट्विटर हँडल बनावट आहे. ते त्याचं अधिकृत ट्विटर हँडल नव्हते.” 2018 मध्ये नोंदवलेल्या गुन्ह्यातील पोलिस तपासात पांड्यावरील आरोप लक्षात घेता खटल्यात एफआर दाखल करण्यात आला होता. पांड्यावर त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अपशब्द लिहिल्याचा आरोप आहे.

‘कॉफी विथ करण’मुळेही गदारोळ

इतकंच नाही तर हार्दिक पांड्या आणि केएल राहुलसह करण जोहरवर लोकप्रिय चॅट शो ‘कॉफी विथ करण’मध्ये महिलांवर असभ्य आणि लैंगिक टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. या तिघांवरही भावना दुखावल्याचा आरोप होता. एससी-एसटी कायद्याच्या विविध कलमांव्यतिरिक्त, या तिघांविरुद्ध 124A, 153A, 295A, 505, 120B IPC अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा

पोलिसांचा अहवाल सादर केल्यानंतर हायकोर्टाने पांड्याची याचिका निकाली काढली आहे. तिन्ही सेलिब्रिटींसाठी दिलासा देणारी ही बातमी आहे. कॉफी विथ करण हा शो अनेकदा वादात सापडला आहे. सध्या या शोचा सातवा सिझन डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होत आहे.