Karan Johar | करण जोहर याला नेटकऱ्यांनी फटकारले, थेट सुनावले खडेबोल, स्टार किड्सला…
करण जोहर याने एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवलाय. मात्र, करण जोहर हा त्याच्या चित्रपटांपेक्षा अधिक वादात सापडलेला दिसतो. करण जोहर याच्यावर स्टार किड्सला बाॅलिवूडमध्ये लाॅन्च करण्याचा आरोप आहे.
मुंबई : करण जोहर हा कायमच चर्चेत असतो. अनेकदा सोशल मीडियावर करण जोहर (Karan Johar) हा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर दिसतो. करण जोहर याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. मात्र, फार कमी लोक हे करण जोहर याच्याबद्दल चांगले बोलताना दिसतात. जास्त करून लोक हे कायमच करण जोहर याच्यावर टिका (Criticism) करताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच करण जोहर याचा राॅकी की आैर रानी की प्रेम कहानी हा चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे या चित्रपटाला धमाका करण्यात यश मिळाले.
राॅकी आैर रानी की प्रेम कहानी या चित्रपटाकडून सुरूवातीपासूनच मोठ्या अपेक्षा होत्या. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंह हे मुख्य भूमिकेत दिसले. विशेष म्हणजे यांच्या जोडीने मोठा धमाका केला. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना रणवीर सिंह आणि आलिया भट्ट हे दिसले. या चित्रपटाच्या गाण्याची शूटिंग राहा हिच्या जन्मानंतर आलियाने केलीये.
Bollywood never ceases to surprise! #KaranJohar, known for hosting big celebs, has decided to give a platform to nepo kids rather than the talented actors. And guess who’s missing out? #KanganaRanaut, whose film Tejas is hitting theaters next week!
— आदित्य दास (@can5peak) October 20, 2023
करण जोहर हा सध्या त्याच्या आगामी कॉफी विथ करण या शोमुळे जोरदार चर्चेत आहे. कॉफी विथ करण या शोचे नवे सीजन सुरू होतंय. विशेष म्हणजे या शोच्या माध्यमातून करण जोहर हा कायमच मोठे खुलासे करताना दिसतो. या शोमध्ये बाॅलिवूडचे मोठे कलाकार हे उपस्थित राहतात. यावेळी करण जोहर हा नेहमीच त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल बोलताना दिसतो.
आता नुकताच करण जोहर याच्या कॉफी विथ करण या शोमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांची लिस्ट पुढे आलीये. यंदा या शोमध्ये बरेच स्टार किड्स सहभागी होताना दिसणार आहेत. यामुळेच आता करण जोहर याला खडेबोल हे सुनावले जात आहेत. आपल्या शोमधून स्टार किड्सला चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न करण जोहर करत असल्याचा आरोप आहे.
#KaranJohar’s Koffee with Karan guest list has pretty everyone but Kangana Ranaut! Nepo kids se leke sab hai! But #KanganaRanaut nahi, despite knowing that her film is gearing up for release! How is it fair?
— Smriti (@smriti915) October 20, 2023
इतकेच नाही तर या लिस्टमध्ये कंगना राणावत हिच्या नावाचा समावेश नसल्याने अनेकांनी संताप हा व्यक्त केलाय. कंगना राणावत हिच्यासारख्या मोठ्या अभिनेत्रीला डावलून करण जोहर हा स्टार किड्सला बोलवत असल्याने हे अनेकांना आवडले नसल्याचे स्पष्ट दिसतंय. आता यामुळेच करण नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आल्याचे बघायला मिळते. अनेकांनी याबद्दलच्या पोस्ट शेअर केल्या आहेत.