AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

22 कॅरेट सोन्याचा नेकलेस, 95 हजारांचा फोन; ‘कॉफी विथ करण’च्या पाहुण्यांना मिळतात इतके महागडे गिफ्ट्स

कॉफी विथ करण या चॅटशोमध्ये हजेरी लावणाऱ्या सेलिब्रिटींना करण जोहरकडून खास भेटवस्तू मिळतात. या गिफ्ट हँपरमध्ये कोणकोणत्या भेटवस्तूंचा समावेश असतो, याचा खुलासा नुकताच करण जोहरने केला आहे. त्याने सोशल मीडियावर यासंदर्भातील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

22 कॅरेट सोन्याचा नेकलेस, 95 हजारांचा फोन; 'कॉफी विथ करण'च्या पाहुण्यांना मिळतात इतके महागडे गिफ्ट्स
Karan JoharImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 26, 2024 | 9:48 AM

मुंबई : 26 जानेवारी 2024 | निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा चॅट शो खूप लोकप्रिय आहे. या शोमध्ये विविध सेलिब्रिटी हजेरी लावतात. त्यांच्यासोबत करण गप्पा मारतो. यानिमित्ताने सेलिब्रिटींविषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेण्याची संधी चाहत्यांना मिळते. सध्या ‘कॉफी विथ करण’चा आठवा सिझन डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिझनमध्ये आतापर्यंत दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, शर्मिला टागोर, सैफ अली खान, झीनत अमान, नीतू कपूर, जान्हवी आणि खुशी कपूर यांच्यासारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. तुम्ही पाहिलं असेल की या शोमध्ये रॅपिड फायर राऊंड जिंकणाऱ्या सेलिब्रिटीला करण एक गिफ्ट हँपर देतो. या गिफ्ट हँपरसाठी सेलिब्रिटी खूप उत्सुक असतात. ज्या भेटवस्तूसाठी सेलिब्रिटी इतके उत्सुक असतात, त्यात नेमकं काय असतं हे जाणून घेण्याची अनेकांची इच्छा आहे. आता खुद्द करणने त्यावरून पडदा उचलला आहे.

‘कॉफी विथ करण’मधील प्रेक्षकांचा सर्वांत आवडता भाग म्हणजे रॅपिड फायर राऊंड. यामध्ये करण सेलिब्रिटींना काही प्रश्न विचारतो आणि त्यांना त्यांची उत्तरं जराही वेळ न दवडता द्यायचं असतं. आता करण जोहरने ‘द कॉफी हँपर’मध्ये सेलिब्रिटींना दिल्या जाणाऱ्या गिफ्ट हँपरची झलक दाखवली आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये गिफ्टची झलक पहायला मिळतेय.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

‘कॉफी विथ करण’च्या सेटवर बसलेला करण या व्हिडीओमध्ये एकेक करून सर्व भेटवस्तू दाखवतो. त्याने सांगितलं की या वर्षाच्या गिफ्ट हँपरमध्ये अत्यंत खास आणि आलिशान वस्तू होत्या. यावर्षी विशेषकरून भारतीय लग्झरी ब्रँडचे प्रॉडक्ट्स या हँपरमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. यामध्ये तयानी ज्वेलरीकडून नेकलेस आणि कानातल्यांचा सेट असून त्याची किंमत जवळपास एक लाख रुपये इतकी आहे. यासोबतच गो प्रो 11 वॉटरप्रूफ कॅमेरा आहे, ज्याची किंमत 30 ते 35 हजार रुपये आहे. इतकंच नव्हे तर सोनोस ब्रँडचे स्पीकरसुद्धा आहेत, जे जवळपास 35 हजार रुपये किंमतीचे आहेत.

करणने पुढे असंही सांगितलं की तो त्याच्या सेटवर येणाऱ्या सेलिब्रिटींना गुगल पिक्सल 8 प्रो मोबाइल कॅमेरासुद्धा देतो. ज्याची बाजारातील किंमत तब्बल 95 हजार रुपये इतकी आहे. याशिवाय 10 हजार रुपयांचा पारकोस ब्रँडचा परफ्युम, 59 हजारांचा बॉडी मसाजर, बदाम शॉवर जेल, किचन कटलरी, प्लेवर्ड टी-बॅग्स, चॉकलेट्स, ब्राऊनी, मध आणि करण जोहरचा खास कॉफी मग यांचाही त्यात समावेश असतो.

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.