Karan Johar : महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवांना जान्हवी कपूर सारा अली खान यांनी डेट केलंय, करण जोहरने केला खुलासा

त्यानंतर सोशल मीडियावर देखील त्याबाबत चर्चा रंगली होती. अनेक नेटकऱ्यांनी त्यावर टिपणी देखील केली आहे. आत्तापर्यंत करणने त्याच्या वादग्रस्त शो 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात अनेकांचं खासगी आयुष्य उजेडात आणलं आहे.

Karan Johar : महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवांना जान्हवी कपूर सारा अली खान यांनी डेट केलंय, करण जोहरने केला खुलासा
महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवांना जान्हवी कपूर सारा अली खान यांनी डेट केलंय, करण जोहरने केला खुलासा Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jul 16, 2022 | 7:34 AM

मुंबई – प्रत्येक सेलिब्रिटीचं (Celebrity) खासगी आयु्ष्य जाणून घेण्याचा त्यांच्या चाहत्यांचा किंवा इतरांचा अधिक प्रयत्न असतो. त्यामुळे टिव्हीला असे काही कार्यक्रम (TV Show) आहेत. तिथं त्यांच्या खासगी आयुष्याबाबत अनेकदा चर्चा केली जाते. ते कार्यक्रम लोकांच्या अधिक पसंतीला आहेत. करण जोहर (Karan Johar)त्याच्या वादग्रस्त शो ‘कॉफी विथ करण’चा सातवा सीझन सध्या सुरु आहे. याही आगोदर त्यांने त्याच्या कार्यक्रमात अधिक चांगले खुलासे केले आहेत. यावेळी त्याने बॉलीवूडच्या नव्या तारखांच्या खासगी आयुष्याबाबत त्या कार्यक्रमात खुलासा केला आहे. सारा अली खान (Sara Ali Khan) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) या दोघी करणच्या कार्यक्रमात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी कोरोनाच्या आगोदर दोन भावांना डेट केले होते याचा खुलासा करणने कार्यक्रमात केला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे नातू वीर पहारिया आणि शिखर पहारिया यांना दोघींनी डेट केलं आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

जान्हवी कपूर आणि सारा अली खान यांच्यात खूप वर्षांपासून घट्ट मैत्री आहे

करणने आत्तापर्यंत त्याच्या कार्यक्रमात अनेकांच्या खासगी आयुष्याबाबत खुलासे केले आहेत. त्यामुळे त्या प्रत्येक भागाची लोक आतुरतेने वाट पाहत असतात. करण त्या स्टाईलमध्ये गप्पा मारत खुलासे करीत असतो. सध्या त्याच्या वादग्रस्त कार्यक्रमाची सगळीकडे चर्चा आहे. जान्हवी कपूर आणि सारा अली खान यांच्यात खूप वर्षांपासून घट्ट मैत्री आहे. त्यांनी त्यांच्या करिअरचा सुरुवात करण्यापूर्वीपासून त्यांची मैत्री आहे. त्यांनी अनेकदा जाहीर कार्यक्रमात ही गोष्ट जाहीरपणे सांगितली आहे. करणने कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला माहित आहे की, तुम्ही खूप जुन्या मैत्रीणी आहात असं सांगितलं. त्यानंतर पण मला आठवतंय की तुम्ही दोघांनी आधी दोन भावांना डेट केलं आहे. त्यानंतर साराला आणि जान्हवीला एकदम आश्चर्य वाटलं.

सोशल मीडियावर देखील त्याबाबत चर्चा रंगली

त्यानंतर सोशल मीडियावर देखील त्याबाबत चर्चा रंगली होती. अनेक नेटकऱ्यांनी त्यावर टिपणी देखील केली आहे. आत्तापर्यंत करणने त्याच्या वादग्रस्त शो ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात अनेकांचं खासगी आयुष्य उजेडात आणलं आहे. त्यामुळे तो नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे. बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर वीर पहारियाचा भाऊ शिखर पहारियासोबतच्या नात्यामुळे चर्चेत होती. जान्हवीची त्यावेळी आई श्रीदेवी खूप नाराज झाली होती आणि तिने तिला हे सर्व संपवायला सांगितले होते. तसेच करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला होता.

श्रीदेवी खूप नाराज झाली होती

बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर वीर पहारियाचा भाऊ शिखर पहारियासोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. मात्र, या बातम्यांमुळे जान्हवीची आई श्रीदेवी खूप नाराज झाली होती आणि तिने तिला हे सर्व संपवायला सांगितले होते आणि करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला होता. 2016 मध्ये जान्हवी आणि शिखरच्या नात्याची चर्चाही सुरू झाली होती. वास्तविक, एका पार्टीत घेतलेला त्यांचा किसिंग फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आणि त्यानंतर त्यांच्या अफेअरची बरीच चर्चा झाली. मात्र, लवकरच त्यांच्यातील अंतराच्या बातम्याही येऊ लागल्या. जरी, आता जान्हवीने तिच्या करिअरमध्ये आणि आयुष्यात प्रगती केली आहे, परंतु ते अजूनही चांगले मित्र आहेत. जान्हवीचा ‘धडक’ शिखर हा चित्रपट खूप आवडला आणि तिने सोशल मीडियावर व्यक्तही केला.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.