Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूनेला टाईमपास म्हणणाऱ्यांवर भडकला करण जोहर, ट्रोलर्सना दिले चोख प्रत्युत्तर

चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने त्याच्या ट्रोलर्लचा चांगलाच समाचार घेतला. सतत ट्रोलिंग करणाऱ्यांना करणने सुनावले खडे बोल..

सूनेला टाईमपास म्हणणाऱ्यांवर भडकला करण जोहर, ट्रोलर्सना दिले चोख प्रत्युत्तर
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 29, 2023 | 9:48 AM

मुंबई | 29 डिसेंबर 2023 : निर्माता -दिग्दर्शक करण जोहर आणि वाद हे काही नवे समीकरण नाही. त्याला ट्रोलिंगचीही बरीच सवय आहे. पण सोशल मीडियावर होणारं ट्रोलिंग आणि त्यामुळे मिळणारी नकारात्मकता याबद्दल बोलताना करण जोहर कधीच मागे हटत नाही. दरवेळेस तो ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर देत त्यांची बोलत बंद करतो. यावेळीही असंच काहीसं झालं आहे. खरंतर एका युजरने करण जोहरला दिलेल्या सल्ल्यावरून रान पेटलं आहे. ‘घरी एक सून आण, (तुझ्या) आईचा टाईमपास तरी होईल’ असा सल्ला एका युजरने दिल्यानंतर करण जोहर भडकला.

त्यानंतर त्याने इन्स्टाग्राम स्टोरीजवर एक लांबलचक पोस्ट शेअर करत त्या ट्रोलरला चोख प्रत्युत्तर तर दिलेच पण इतरांनाही खडे बोल सुनावले. त्याची ही पोस्ट सध्या भलतीच चर्चेत आहे. करणने त्याच्या मनातील भावना अगदी उघडपणे या पोस्टमध्ये लिहील्या आहेत.

काय होती युजरची कॉमेंट

‘आईसाठी सूनबाई घेऊन ये, त्यांचा टाईमपास होईल’ अशी कमेंट एका युजरने केली होती. मात्र ही बाब काही करणला फारशी आवडली नाही. पण तो काही त्या सोशल मीडिया युजरकडे दुर्लक्ष करण्याच्या मूडमध्येही नव्हता. त्याने सरळ त्या युजरला सुनावले. ‘कोणतीही सून कोणत्याही सासूसाठी टाईमपास बनू नये आणि सूनेची स्वत:ची एक ओळख असते.’

करणने थेट घेतला क्लास

करणने लिहिले की, ‘माझ्या आयुष्यातील निवडीबद्दल आणि माझ्या जगण्याच्या पद्धतींबद्दल मला मिळालेल्या सर्व शिव्या, ट्रोलिंग आणि टीकांपैकी मला अशा कमेंट्स सर्वात आक्षेपार्ह वाटतात. सर्वप्रथम, कोणत्याही सुनेने कोणाच्याही आईसाठी टाइमपास ठर नये. सून तिचा वेळ वैयक्तिक आणि व्यावसायिकरित्या तिला पाहिजे तसा घालवू शकते’.

आईबद्दल लिहीली ही गोष्ट

एवढंच नव्हे तर करणने पुढे त्याच्या आईबद्दलही बरंच लिहीलं आहे. ‘ याशिवाय मी सर्वांना सांगू इच्छितो की, माझी आई माझ्यासोबत माझ्या मुलांची यश आणि रुही यांची काळजी घेते आणि तिला कोणत्याही टाईमपासची गरज नाही. (नातवंडांकडून) मिळालेल्या प्रेमाने तिचे आयुष्य पूर्ण झाले आहे. आम्ही सर्व जण तिला तेच प्रेम पूर्णपणे देण्याचा प्रय्त करू. माझ्या नात्यांबद्दल, त्यांच्या स्थितीबद्दल ज्यांना काळजी आहे, त्यासाठी सून आणणे हा काही पर्याय नाही. माझी मुले भाग्यवान आहेत की माझ्या आईने आम्हा सर्वांना मार्गदर्शन केले आणि आयुष्यात मला कोणी जोडीदार मिळाला तर मी त्या व्यक्तीला सांगेन की माझ्या आयुष्यातील पोकळी भरून काढ. इतर कोणाच्या नव्हे’ अशा शब्दात करणने ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर दिले.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.