Kareena Kapoor | १० वर्ष मोठ्या सैफ अली खान यांच्यासोबत कसं आहे करीनाचं वैवाहिक आयुष्य?
Kareena Kapoor | 'नात्याला पुढे नेण्यासाठी...', सैफ अली खान याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल करीना कपूर हिचं मोठं वक्तव्य, दोघांमध्ये १० वर्षांचं अंतर... सध्या सर्वत्र अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर खान यांच्या नात्याची चर्चा... कसं आहे दोघांचं नातं?

मुंबई : 27 सप्टेंबर 2023 | अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. चाहत्यांना देखील दोघांची जोडी प्रचंड आवडते. सोशल मीडियावर देखील करीना, पती आणि मुलांवर असलेलं प्रेम व्यक्त करत असते. सोशल मीडियावर करीनाच्या कुटुंबाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करीना आणि सैफ यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. सैफ आणि करीना यांच्यामध्ये १० वर्षांचं अंतर आहे. यामुळे दोघांना ट्रोल देखील करण्यात आलं. पण दोघांनी कायम त्यांच्या भावनांना अधिक महत्त्व दिलं.
करीना हिने अनेक मुलाखतींमध्ये देखील सैफ अली खान याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल सांगितलं आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘आम्हाला एकमेकांसोबत आणि एकमेकांच्या बाजूला राहायला आवडतं…ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. एका आनंदी नात्याचं कोणतेही गुपित नसतं. कोणत्याही नात्यात सर्वात महत्त्वाचं प्रेम आहे…’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘आपल्याला एकमेकांना अधिक पसंत केलं पाहिजे. एकमेकांसोबत गप्पा मारायला हव्यात. एकमेकांजवळ रहायला हवं. माझ्यासाठी सैफ जगातील सर्वात चांगला व्यक्ती आहे. मी दुसऱ्या कोणासोबत अधिक वेळ व्यतीत करण्याचा विचार करत नाही. कारण मला सैफ याच्यासोबत अधिक काळ राहायला आवडतं…’




‘मला वाटतं याच गोष्टीमुळे नातं पुढे जाण्यास मदत होते… मी सैफला कायम मिस करत असते. मला सैफ याच्यासोबत काम करायचं आहे. तो एक उत्तम अभिनेता आहे. पण तो मला कायम म्हणतो, ‘मला नाही माहिती आपण एकत्र काम करु शकतो की नाही….’ सध्या सर्वेत्र करीना कपूर हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
करीना सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.
करीना हिचं ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण
‘हिरोईन’, ‘जब व्ही मेट’, ‘3 इडियट्स’, ‘जाने जान’, ‘रा.वन’, ‘गूड न्यज’, ‘डॉन’ यांसरख्या एकापेक्षा एक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री करीना कपूर हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. सध्या अभिनेत्री ‘जानेजान’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाच्या माध्यमातून करीना हिने ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं आहे.