लेकाचा परफॉर्मेंस पाहून करीना कपूर हिचा आनंद पोहोचला शिगेला, व्हिडीओ व्हायरल
Taimur Ali Khan Video : तैमूर अली खान याला स्टेजवर डान्स करताना पाहून आई करीना कपूर हिचा आनंद पोहोचला शिगेला, व्हिडीओ पाहून म्हणाल..., सोशल मीडियावर तैमूर अली खान याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मुंबई | 16 डिसेंबर 2023 : बॉलिवूडमधील दमदार अभिनेत्यांचा विषय निघाला की अभिनेता सैफ अली खान याचं नाव अव्वल स्थानी असतं. सैफ याची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूर देखील बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तर खान कुटुंबाचा मुलगा तैमूर अली खान देखील लोकप्रिय आणि प्रसिद्ध स्टारकिड आहे. तैमूर याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण सध्या व्हायरल होत असलेला करीनाच्या लेकाचा व्हिडीओ फार खान आहे. नुकताच, तैमूर याच्या शाळेत एक कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात तैमूर याने डान्स परफॉर्मेंस देखील दिला.
सांगायचं झालं तर, तैमूर अली खान धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल शिक्षण घेत आहे. नुकताच तैमूर याचा एनुअल फंक्शन पार पाडला. 14 डिसेंबर रोजी एनुअल फंक्शन मोठ्या उत्साहात पार पाडला. तैमूर याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तैमूर डान्स करताना फार क्यूट दिसत आहे.
View this post on Instagram
व्हिडीओमध्ये तैमूर डान्स करताना दिसत आहे तर, करीना लेकाच्या आयुष्यातील अमुल्य क्षण कॅमेऱ्यात टिपताना दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तैमूर याच्या डान्सची चर्चा रंगत आहे. व्हिडीओमध्ये करीना हिच्यासोबत दिग्दर्शक करण जोहर देखील दिसत आहे. व्हिडीओमध्ये तैमूर याच्या मागे अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा अबराम खान देखील दिसत आहे.
सोशल मीडियावर कायम तैमूर याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. तैमूर लहान असल्यापासून चर्चेत आहे. अनेक ठिकाणी तैमूर याला आई करीना कपूर आणि वडील सैफ अली खान यांच्यासोबत स्पॉट करण्यात येतं. करीना देखील तैमूर आणि जेह यांच्यासोबत फोटो पोस्ट करत असते.
करीना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी करीना कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.