“मुलासाठी 5-5 तास पण अमीषाकडे 5 सेकंदही..”; ‘कहो ना प्यार है’वरून करीनाची राकेश रोशन यांच्यावर टीका

करीना आणि हृतिकने बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. प्रेक्षकांना या दोघांची ऑनस्क्रीन जोडी खूपच आवडली होती. कभी खुशी कभी गम, मुझसे दोस्ती करोगे, मैं प्रेम की दिवानी हूँ, यादें यांसारख्या चित्रपटांमध्ये करीना आणि हृतिकने स्क्रीन शेअर केला होता.

मुलासाठी 5-5 तास पण अमीषाकडे 5 सेकंदही..; 'कहो ना प्यार है'वरून करीनाची राकेश रोशन यांच्यावर टीका
Kareena Kapoor on Kaho Na Pyaar HaiImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 22, 2023 | 11:33 AM

मुंबई : अभिनेत्री करीना कपूर खानने ‘रेफ्युजी’ या चित्रपटातून अभिनेता अभिषेक बच्चनसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र फार क्वचित लोकांना माहीत असेल की करीनाला हृतिक रोशनसोबत ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाची ऑफर मिळाली होती. खुद्द करीनाने याबद्दलचा खुलासा केला आहे. त्याचप्रमाणे चित्रपट नाकारण्याचा निर्णय योग्यच होता, असंही ती म्हणाली. हृतिक रोशन आणि अमीषा पटेल यांनी ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटात पहिल्यांदा स्क्रीन शेअर केला होता. हा या दोघांच्या करिअरमधील पहिलाच चित्रपट होता. हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.

‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाची ऑफर नाकारल्याचा पश्चात्ताप होतो का कधी, असा प्रश्न विचारल्यावर करीनाने तिच्याच बेधडक अंदाजात उत्तर दिलं. ती म्हणाली, “तो चित्रपट हृतिकसाठीच बनवण्यात आला होता. त्याच्या प्रत्येक क्लोज-अप शॉसाठी, प्रत्येक फ्रेमसाठी त्याच्या वडिलांनी पाच-पाच तास मेहनत घेतली होती. मात्र अमीषासाठी त्यांनी पाच सेकंदंसुद्धा दिली नव्हती. चित्रपटातील काही सीन्समध्ये अमीषाच्या चेहऱ्यावर पुरळ आणि डोळ्यांखाली काळे डाग दिसत होते. ती सुंदर दिसत नव्हती, पण हृतिकचा प्रत्येक शॉट जणू स्वप्नवत होता.”

हे सुद्धा वाचा

“अमीषाच्या जागी जर मी त्या चित्रपटात असते, तर मला नक्कीच चांगली डील मिळाली असती. पण मला अजूनही असं वाटतं की प्रेक्षकांनी आम्हा दोघांच्या भूमिकांवर समान लक्ष दिलं असतं. त्यामुळे बरं झालं की मी तो चित्रपट स्वीकारला नाही. मला याचंही समाधान आहे की मी ऑफर नाकारल्यानंतरही हृतिक आणि माझ्या मैत्रीत कटुता आली नाही. तो अजूनही माझा चांगला मित्र आहे. मी त्याच्या यशाबद्दल खूप खुश आहे”, असं ती पुढे म्हणाली.

नंतर करीना आणि हृतिकने बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. प्रेक्षकांना या दोघांची ऑनस्क्रीन जोडी खूपच आवडली होती. कभी खुशी कभी गम, मुझसे दोस्ती करोगे, मैं प्रेम की दिवानी हूँ, यादें यांसारख्या चित्रपटांमध्ये करीना आणि हृतिकने स्क्रीन शेअर केला होता. तर ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटानंतर अमीषा पटेलने काही चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. मात्र एका काळानंतर तिला ऑफर्स मिळणं कमी झालं होतं. अमीषा आता बऱ्याच वर्षांनंतर ‘गदर 2’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.