Ajay Devgn साठी ‘या’ दोन प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये वाद; अभिनेत्यानं उरकलं काजोलसोबत लग्न

अजय देवगण याच्यासाठी दोन प्रसिद्धीमधील वाद पोहोचला टोकाला; दोघी एकमेकींचं तोंड देखील पाहत नव्हत्या, अशात अभिनेत्याने काजोल हिच्यासोबत केलं लग्न

Ajay Devgn साठी 'या' दोन प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये वाद; अभिनेत्यानं उरकलं काजोलसोबत लग्न
Follow us
| Updated on: Mar 18, 2023 | 5:19 PM

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेता अजय देवगण बॉलिवूडवर राज्य करत आहे. अनेक सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेला अजय ९० च्या दशकापासून चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. आज अभिनेता पत्नी आणि अभिनेत्री काजोल हिच्यासोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा होता जेव्हा अनेक अभिनेत्रींसोबत अभिनेत्याचं नाव जोडण्यात आलं. अजयच्या खासगी आयुष्याच्या चर्चा आजही चाहत्यांमध्ये तुफान रंगलेल्या असतात. अजय याचं नाव अभिनेत्री करिश्मा कपूर आणि रवीना टंडन यांच्यासोबत देखील जोडण्यात आलं. रवीना टंडन आणि अजय देवगण यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा तुफान रंगल्या होत्या.

रवीना टंडन आणि अजय देवगण यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. सिनेमांमध्ये एकत्र काम करत असताना त्यांचं नातं देखील भक्कम होत होतं. पण अभिनेत्याच्या आयु्ष्यात अभिनेत्री करिश्मा कपूर हिची एन्ट्री झाल्यानंतर अजय आणि रवीना यांच्यात वाद सुरु झाले. तेव्हा रवीना आणि अजय यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं होतं, तर दुसरीकडे करिश्माने नुकताच इंडस्ड्रीमध्ये पदार्पण केलं होतं.

हे सुद्धा वाचा

१९९२ साली प्रदर्शित झालेल्या ‘जिगर’ सिनेमात अजय आणि करिश्मा यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली होती. सिनेमाच्या शुटिंग दरम्यान अजय आणि करिश्मा यांच्यातील नातं नवं रुप घेत होतं. दोघांच्या नात्याचे किस्से अनेक मासिकांमध्ये देखील छापून येवू लागले. जेव्हा अजय आणि करिश्मा याच्या नात्याबद्दल रवीना हिला मोठा धक्का बसला.

अजय आणि करिश्मा नात्याची चर्चा जेव्हा रंगली होती, तेव्हा अभिनेत्याचं रवीना हिच्यासोबत ब्रेकअप झालं नव्हतं. शुटिंगनंतर अजय आणि करिश्मा तासन् तास फोनवर गप्पा मारायचे. अजय देवगण याच्यामुळे करीश्मा आणि रवीना यांच्यातील वाद टोक पोहोचले. एवढंच नाही तर, दोघी एकमेकींचं तोंड देखील पाहत नव्हत्या. दोघींमध्ये मारहाण देखील झाल्याच्या चर्चांनी जोर धरला.

पण एवढ्या मोठ्या प्रसंगानंतर अजय याने रवीना आणि करिश्मा दोघींपैकी एकीसोबतही लग्न न करता अभिनेत्री कजोल हिच्यासोबत लग्न केलं. जेव्हा करीश्मा आणि रवीना यांच्यामध्ये वाद सुरु होते, तेव्हा अजय आणि काजोल यांच्यामध्ये प्रेम बहरलं. अखरे अजय याने काजोल हिच्यासोबत लग्न केलं.

आज अभिनेता त्याच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री रवीना टंडन देखील तिच्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. पण करिश्मा कपूर हिने खासगी आयुष्यात अनेक चढ – उतारांचा सामना केला. घटस्फोटानंतर करिश्मा कपूर दोन मुलांचा ‘सिंगल मदर म्हणून’ सांभाळ करत आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.