करिश्मा कपूर हिच्या लेकीचं हटके ट्रांसफॉर्मेशन, आईपेक्षा अधिक ग्लॅमरस, चाहते म्हणाले, ‘दमदार…’
karisma kapoor daughter : करिश्मा कपूर हिच्या लेकीच्या अदांवर चाहते फिदा... समायरा कपूर हिने हटके ट्रांसफॉर्मेशन, आईपेक्षा कित्येक पटीने ग्लॅमरस दिसत समायरा... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त समायरा कपूर हिच्या लूकची चर्चा...
मुंबई | 07 फेब्रुवारी 2024 : अभिनेत्री करिश्मा कपूर हिने आता पर्यंत अनेक सिमेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आज करिश्मा बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता करिश्मा हिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही त, लेक समायरा कपूर हिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर करिश्माच्या लेकीचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये करिश्मा हिने लेक समायरा हिच्यासोबत खास पोज दिली आहे.
समायरा हिचा हटके ट्रांसफॉर्मेशन पाहून चाहते देखील हैराण झाले आहे. समायरा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, समायरा 18 वर्षांची झाली आहे. समायरा तिच्या आईपेक्षा देखील अधिक हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये करिश्मा आणि समायरा काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहेत.
सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त समायरा हिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकची चर्चा रंगली आहे. चाहते देखील समायरा हिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘कपूर कुटुंबातील सर्वात सुंदर मुलगी..’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘ही आमची दुसरी लोलो…’ एवढंच नाही तर, अनेकांना समायरा बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार? असे प्रश्न देखील विचारले आहेत.
समायरा कपूर ही करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांनी मोठी मुलगी आहे. दोघांना फक्त मुलगी नाही तर, एक मुलगा देखील आहे. संजय कपूर यांच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर करिश्मा हिने सिंगल मदर म्हणून मुलांचा सांभाळ केला. सोशल मीडियावर करिश्मा कायम मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
करिश्मा हिने पहिला पती आणि सासरच्या मंडळींवर अनेक गंभीर आरोप केले होते. घटस्फोटानंतर संजय याने तिसरं लग्न केलं. पण करिश्मा हिने कधीच दुसरा संसार थाटण्याचा निर्णय घेतला नाही. करिश्मा कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.
करिश्मा आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर करिश्मा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.