Aashiqui 3 | अखेर ‘आशिकी 3’ चित्रपटाबद्दल अत्यंत मोठे अपडेट पुढे, कार्तिक आर्यन पुढच्या वर्षीच
बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याचे चित्रपट एका मागून एक मोठा धमाका करताना दिसत आहेत. कार्तिक आर्यन याचा काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला सत्यप्रेम की कथा या चित्रपटाने जलवा दाखवला. विशेष म्हणजे कार्तिक आर्यन याचा हा चित्रपट हिट ठरला.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटांमुळे जोरदार चर्चेत आहे. कार्तिक आर्यन याचे चित्रपट मोठा धमाका करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच चर्चा होती की, हेरा फेरी 3 या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन हा दिसणार असून अक्षय कुमारची जागा आता कार्तिक आर्यन याने घेतली आहे. इतकेच नाही तर एका जाहीर कार्यक्रमात अक्षय कुमार (Akshay Kumar) याने सांगितले की, मला हेरा फेरी 3 ची स्क्रीप्ट आवडली नसल्याने मी चित्रटाला नकार दिलाय. यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला.
अक्षय कुमार याने अचानकपणे हेरा फेरी 3 चित्रपटाला होकार दिला. कार्तिक आर्यन याचा काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला. सत्यप्रेम की कथा हा चित्रपट हिट ठरला. सत्यप्रेम की कथा या चित्रपटाने तूफान अशी कामगिरी केली. कार्तिक आर्यन याच्यासोबत या चित्रपटात कियारा अडवाणी ही देखील मुख्य भूमिकेत दिसली. या जोडीने धमाका केला.
कार्तिक आर्यन हा सध्या त्याच्या आगामी चित्रपटामध्ये बिझी आहे. या चित्रपटाचे शूटिंग हे विदेशात सुरू आहे. आता कार्तिक आर्यन याच्या आशिकी 3 चित्रपटाबद्दल अत्यंत मोठे अपडेट पुढे आले आहे. आशिकी 3 चित्रपटाची शूटिंग कार्तिक आर्यन हा पुढच्या वर्षी सुरू करणार आहे. सध्या चित्रपटाचे काम सुरू असून काम महत्वाच्या टप्यात असल्याचे सांगितले जात आहे.
Thank you for 100 cr ka Love 🤍🙏🏻#SatyaPremKiKatha in cinemas #SajidNadiadwala @advani_kiara @sameervidwans @shareenmantri @kishorarora19 @karandontsharma @DoP_Bose @NGEMovies @namahpictures @WardaNadiadwala@raogajraj #SupriyaPathakKapur @IamSiddharthR #ShikhaTalsania… pic.twitter.com/Wf5HGMPQIb
— Kartik Aaryan (@TheAaryanKartik) July 11, 2023
आशिकी 3 चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन याला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह हा बघायला मिळतोय. आशिकी 3 चित्रपटात कार्तिक आर्यन हा नेमका काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. आशिकी 3 मध्ये कार्तिक आर्यन याच्यासोबत नेमकी कोणती अभिनेत्री दिसणार याबद्दल अजूनही घोषणा ही करण्यात नाही आली.
मध्यंतरी एक चर्चा होती की, आशिकी 3 मध्ये कार्तिक आर्यन याच्यासोबत सारा अली खान ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ही बातमी ऐकताच सारा अली खान हिच्या चाहत्यांमध्ये उत्साह हा बघायला मिळाला. कार्तिक आर्यन आणि सारा अली खान हे एकमेकांना डेट करत असल्याचे देखील सांगितले जात होते. मात्र,काही दिवसांपूर्वीच यांचे ब्रेक झाले.