‘कधीच ब्रेकअप करणार नाही…’, Kartik Aaryan ने कोणाला दिलं कायम सोबत राहण्याचं वचन?
अभिनेता कार्तिक आर्यन फक्त त्यांच्या प्रोफेशनलच नाही, तर खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो.
Kartik Aaryan : ‘प्यार का पंचनामा’, ‘भूल भुलैय्या 2’ चित्रपटांमुळे अभिनेता कार्तिक आर्यनच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. आज बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये कार्तिकचं नाव देखील अव्वल स्थानी आहे. वाढत्या लोकप्रियतेनंतर अभिनेता फक्त त्याच्या प्रोफेशनलच नाही, तर खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत कार्तिकचं नाव जोडण्यात आलं, पण कार्तिकने कधीही त्याच्या खासगी आयुष्याला दुजोरा दिला नाही.
सध्या कार्तिकची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्याने ‘कधीच ब्रेकअप करणार नाही…’ असं लिहिलं आहे. अभिनेत्याच्या पोस्टनंतर प्रत्येकाला असा प्रश्न पडला आसेल, की कार्तिक त्याच्या आयुष्यात कोणासोबत ब्रेकअप करणार नाही?
जीमसोबत कधीही ब्रेकअप न करण्याचा खुलासा अभिनेत्याने कॅप्शनमध्ये केला आहे. स्वतःचा एक फोटो पोस्ट करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये, ‘मी माझ्या जीमसोबत कधीही ब्रेकअप करणार नाही…’ असं लिहिलं आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अभिनेतून कायम जीम करण्याच वचन दिलं आहे.
View this post on Instagram
एकंदर अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यात फिटनेसला अधिक महत्त्व देत असल्याचं दिसून येत आहे. सध्या अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कार्तिकच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
कार्तिक आर्यन अभिनेता हृतिक रोशनच्या बहिणीला करतो डेट? अभिनेत्री सारा अली खाननंतर कार्तिक आर्यनचं नाव अभिनेता हृतिक रोशनची बहिण पश्मिना रोशनसोबत जोडण्यात येत आहे. पण याबद्दल अभिनेत्याचे स्पष्टीकरण दिलेलं नाही. पश्मिना हृतिकची चुलत बहिण आहे.
पश्मिना अभिनेत्री नसली, तरी इन्स्टाग्रामवर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. पश्मिना कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. शिवाय कुटुंबासोबत देखील पश्मिनाचे अनेक फोटो व्हायरल होत असतात.
पश्मिना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हृतिकची बहिण अभिनेता शाहीद कपूरच्या ‘इश्क विश्क’ चित्रपटाच्या सिक्वलमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.