‘रिलेशनशिपमध्ये अपेक्षा ठेवली पण…’, सारा हिची एक गोष्ट आजही कार्तिक आर्यन याला खटकते, कारण…
Sara Ali Khan : सारा अली खान हिची एक गोष्ट आजही कार्तिक आर्यन याला खटकते, ब्रेकअपनंतर अनेक वर्षांनंतर अखरे अभिनेता व्यक्त झालाच... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कार्तिक आर्यन याच्या वक्तव्याची चर्चा... रिलेशनशिपबद्दल अभिनेता झाला व्यक्त
मुंबई | 21 नोव्हेंबर 2023 : एक काळ असा होता जेव्हा फक्त बॉलिवूडमध्ये नाही तर, चाहत्यांमध्ये देखील अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खान यांच्या नात्याची चर्चा सुरु होती. दोघांनी एकत्र एका सिनेमात काम देखील केलं. ‘लव्ह आज कल’ सिनेमाच्या दुसऱ्या भागात सारा आणि कार्तिक यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली. तेव्हा बॉक्स ऑफिसवर सिनेमा हीट ठरला नाही, पण सारा – कार्तिक यांच्या जोडीला मात्र चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. सिनेमानंतर दोघांना अनेक ठिकाणी स्पॉट देखील करण्यात आलं. पण सारा – कार्तिक यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
ब्रेकअप झाल्यानंतर सारा हिने अनेकदा कार्तिक याच्यासोबत असलेल्या नात्यावर वक्तव्य केलं. दरम्यान, सारा अली खान आणि अभिनेत्री अनन्या पांडे ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये आल्या होत्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार्तिक आर्यन याच्यासोबक दोघींचं देखील नाव जोडण्यात आलं.
शोमध्ये करण याने सारा हिला तिच्या रिलेशनशिपबद्दल विचारलं, तेव्हा अभिनेत्रीने खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या. तर दुसरीकडे कार्तिक याने देखील नात्यांबद्दल मोठा खुलासा केला आहे. एवढंच नाही तर अभिनेत्याने त्याला खटकत असलेली गोष्ट देखील सांगितली आहे. सध्या सर्वत्र कार्तिक याने केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिनेता म्हणाला, ‘रिलेशनशिप दोघांचं असेल तर, दुसऱ्या व्यक्तीने देखील नात्यावर सर्वांसमोर बोलायला नको. प्रत्येकाला त्याच्या नात्याचा आदर करायला हवा. मी कधीही माझ्या रिलेशनशिपवर बोलत नाही. माझ्या पर्टनरकडून देखील मी अशी अपेक्षा करतो…’
पुढे अभिनेता म्हणाला, ‘रिलेशनशिपबद्दल बोलायला मला आवडत नाही. तुम्हाला कायम एकत्र व्यतीत केलेल्या वेळाचा आदर करायला हवा.. प्रत्येकाला स्वतःचा आदर करता आला पाहिजे. जेव्हा तुम्ही बोलता, तेव्हा फक्त समोरचा तुम्हाला ऐकत नसतो, तर प्रत्येकाचं लक्ष तुमच्यावर असतं.’ सध्या सर्वत्र कार्तिक आर्यन याच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
कार्तिक आणि सारा यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांचं ब्रेकअप झालं असलं तरी, दोघे चांगले मित्र आहेत. सारा गणपतीचं दर्शन घेण्यासाठी कार्तिक याच्या घरी गेली होती, तर दिवाळी पार्टीसाठी कार्तिक सारा हिच्या घरी पोहोचला होता. सोशल मीडियावर देखील दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.