Katrina-Vicky Zodiac : ज्योतिषशास्त्रानुसार कसं असेल विकी कौशल कतरिनाचे नातं? पाहा काय सांगतात ग्रह तारे…
बॉलिवूडमध्ये सध्या एकाच चर्चा आहे ती म्हणजे विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या लग्नाची. ९ डिसेंबर रोजी जयपूरमध्ये राजेशाही थाटामध्ये ते दोघेही विवाह बंधनात बांधले गेले. पण तुम्हाला माहीत आहे का या दोघांच्या जोडीबद्दल ज्योतिषशास्त्र काय सांगतंय?

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या एकाच चर्चा आहे ती म्हणजे विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या लग्नाची. ९ डिसेंबर रोजी जयपूरमध्ये राजेशाही थाटामध्ये ते दोघेही विवाह बंधनात बांधले गेले. पण तुम्हाला माहीत आहे का या दोघांच्या जोडीबद्दल ज्योतिषशास्त्र काय सांगतंय? कशी असे यांची जोडी चला तर मग जाणून घेऊयात या जोडीबद्दल ग्रह नक्षत्र काय संकेत देतात.
दोघंच्या ही राशी आहेत ‘प्रामाणिक’ कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या वाढदिवसाच्या तारखेनुसार कतरिनाची रास ‘कर्क’ तर विकीची रास ‘वृषभ’ आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या दोन्ही राशी एकमेकींशी खूपच पुरक आहेत. या दोन राशींचे लोक एकमेकांवर खूप विश्वास ठेवतात. वृषभ राशीच्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर या राशीचे लोक प्रेमाच्या बाबतीत प्रेमळ आणि प्रामाणिक असतात. हे लोक आयुष्यात नात्यांना जास्त महत्त्व देतात. हे लोक लोकांची कधीच फसवणूक करत नाही. याउलट कर्कराशी बद्दल बोलायचे झाले तर हे लोक थोडे मुडी असतात. तसेच खूप हट्टी असतात. या दोन राशींच्या स्वभावांमुळे या राशी एकमेकींशी खूप चांगलं जुळवून घेतील. अस म्हणणं वावग ठरणार नाही.
दोन्ही राशीचे लोक परिवाराला महत्त्व देतात वृषभ राशीच्या लोकांना शारीरिक सुरक्षिततेची आणि कर्क राशीच्या लोकांना भावनिक सुरक्षिततेची गरज असते. विशेष म्हणजे वृषभ राशीच्या लोकांना स्थिर नात्यात राहणे आवडते. वृषभ आणि कर्क या दोन्ही राशीचे लोकांना आपल्या कुटुंबाला आणि घराला महत्त्व देणे आवडते.
दोन्ही राशीचे लोक खूप खर्च करत नाही कर्क आणि वृषभ राशीच्या लोकांना आपले जीवन अतिशय साधेपणाने जगणे आवडते.या दोन राशीच्या लोकांना पैसे वाया घालवणे फारसे आवडत नाही, कर्क राशीचे लोक पैसे खर्च करण्यापूर्वी अनेक वेळा विचार करतात. या सर्वावरुन हे दोघं एकत्र उत्तम आयुष्य जगू शकतात.
टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.
संबंधीत बातम्या
Katrina Kaif-Vicky Kaushal wedding : विकी आणि कतरीनाच्या लग्नाआधी कंडोम कंपनीची ही मजेदार पोस्ट