AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Katrina Kaif | कतरिना कैफने प्रेग्नंसीच्या चर्चांवर अखेर सोडलं मौन; सांगितलं कधी येणार चिमुकला पाहुणा?

अभिनेत्री कतरिना कैफ गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर अखेर कतरिनाने मौन सोडल्याची माहिती समोर येत आहे. गरोदरपणाबद्दल कतरिना तिच्या अत्यंत जवळच्या मित्रमैत्रिणींसमोर व्यक्त झाली. गेल्या काही दिवसांपासून ती माध्यमांपासून दूरच होती.

Katrina Kaif | कतरिना कैफने प्रेग्नंसीच्या चर्चांवर अखेर सोडलं मौन; सांगितलं कधी येणार चिमुकला पाहुणा?
Vicky Kaushal and Katrina Kaif Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 17, 2025 | 2:40 PM

मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ गरोदर असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहेत. यामागचं कारण म्हणजे बरेच दिवस कतरिनाने कोणत्याच कार्यक्रमाला किंवा पार्टीला हजेरी लावली नव्हती. इतकंच नव्हे तर ती पापाराझींपासूनही दूर होती. सलमान खानची बहीण अर्पिताच्या ईद पार्टीला जेव्हा तिला बऱ्याच दिवसांनंतर पाहिलं गेलं, तेव्हा प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण आलं. यावेळी कतरिनाने अनारकली ड्रेस परिधान केला होता. मात्र त्या ड्रेसमध्ये ती तिचं पोट लपवत होती, असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला होता. आता या सर्व चर्चांवर कतरिनाची प्रतिक्रिया समोर आली आहे.

‘ई टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार कतरिना नुकतीच तिच्या मित्रमैत्रिणींसमोर गरोदरपणाबद्दल व्यक्त झाली. पुढील एक – दोन चित्रपटांच्या शूटिंगनंतर बाळाचं प्लॅनिंग करणार असल्याचं तिने सांगितलं. कतरिना सध्या फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्याचसोबतच ती साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीसोबतही ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटात झळकणार आहे. हे दोन्ही प्रोजेक्ट्स पूर्ण झाल्यानंतर विकी आणि कतरिना बेबी प्लॅनिंग करणार असल्याचं समजतंय.

हे सुद्धा वाचा

अर्पिता खानच्या ईद पार्टीतील कतरिनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यापैकी बरेचसे कमेंट्स हे तिच्या प्रेग्नंसीबद्दल होते. ‘मला असं वाटतंय की ती गरोदर आहे’, अशी कमेंट एकाने लिहिली होती. तर ‘तिने बऱ्याच काळानंतर मीडियासमोर हजेरी लावली’ असं दुसऱ्या युजरने म्हटलं. त्यावर कमेंट करत एका नेटकऱ्याने लिहिलं, ‘कारण ती प्रेग्नंट आहे.’ कतरिनाच्या या व्हिडीओवर एका युजरने म्हटलं होतं, ‘ती खरंच प्रेग्नंट आहे का? कारण ती सध्या जिमला जातानाही दिसत नाही. कतरिना थोडी गुबगुबीतही दिसतेय आणि सध्या ती शूटिंगसुद्धा करत नाहीये.’

पहा व्हिडीओ

प्रेग्नंट असल्यामुळे कतरिना पापाराझी किंवा माध्यमांसमोर येत नसल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे. कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी 2021 मध्ये राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली. राजस्थानमध्ये पार पडलेल्या या लग्नसोहळ्याला इंडस्ट्रीतील मोजकेच पाहुणे उपस्थित होते. लग्नापूर्वी या दोघांनी आपल्या नात्याबद्दल कमालीच गुप्तता पाळली होती. आता सोशल मीडियावर विकी-कतरिना एकमेकांबद्दल खुलेपणाने प्रेम व्यक्त करताना दिसतात.

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.