अर्चना गौतमने ‘खतरों के खिलाडी 13’च्या सेटवर त्याला बळजबरीने केलं किस? रोहित शेट्टीने केली कारवाई

'हे खतरों के खिलाडी या शोऐवजी दुसरंच काहीतरी बनत चाललंय. थट्टामस्करी सगळं आपल्या जागी आहे. पण किमान या शोने तरी इतकी खालची पातळी गाठू नये', असं एकाने म्हटलंय. तर 'आम्हाला स्टंट्स पहायचे आहेत. पण हे सर्व काय पहायला मिळतंय', असा सवाल दुसऱ्या युजरने केला आहे.

अर्चना गौतमने 'खतरों के खिलाडी 13'च्या सेटवर त्याला बळजबरीने केलं किस? रोहित शेट्टीने केली कारवाई
Khatron Ke Khiladi 13Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 22, 2023 | 2:59 PM

मुंबई | 22 ऑगस्ट 2023 : ‘खतरों के खिलाडी 13’ हा शो गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या शोमध्ये विविध सेलिब्रिटी सहभागी होतात आणि त्यांना दर आठवड्याला वेगवेगळे स्टंट्स परफॉर्म करायला दिले जातात. यादरम्यान शोचा एक प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये दाखवलंय की अर्चना गौतमला शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अर्चना गौतम याआधी बिग बॉस शोमध्ये झळकली होती. प्रोमोमध्ये सूत्रसंचालक रोहित शेट्टी हा सेटवरील एका घटनेविषयी बोलताना दिसतो. त्यानंतर अर्चना एका क्रू मेंबरसोबत दिसून येते. अर्चनाच्या वागणुकीमुळे तिला शोमधून बाहेर काढण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

अर्चनावर किस केल्याचा आरोप

प्रोमोमध्ये एक क्रू मेंबर सर्वांसमोर सांगतो की अर्चनाने त्याला किस करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रोहित शेट्टी अर्चनाला म्हणतो की, “नियमांनुसार तू या शोमध्ये पुढे सहभागी होऊ शकत नाही.” त्यावर अर्चना स्पष्टीकरण देऊ पाहते. “सर हा मला फसवतोय. मी किसला नकार देत होते, पण त्याने मला किस करण्यास भाग पाडलं.” रोहित त्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसून येतं. त्याच्या या निर्णयाने इतर सर्व स्पर्धकांना आश्चर्याचा धक्का बसतो.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

या नव्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘हे खतरों के खिलाडी या शोऐवजी दुसरंच काहीतरी बनत चाललंय. थट्टामस्करी सगळं आपल्या जागी आहे. पण किमान या शोने तरी इतकी खालची पातळी गाठू नये’, असं एकाने म्हटलंय. तर ‘आम्हाला स्टंट्स पहायचे आहेत. पण हे सर्व काय पहायला मिळतंय’, असा सवाल दुसऱ्या युजरने केला आहे. काहींनी याला पब्लिसिटी स्टंट असल्याचंही म्हटलंय. या शोमधून आतापर्यंत रुही चतुर्वेदी आणि डेझी शाह हे स्पर्धक बाद झाले आहेत. अर्चनाची शोमधून एक्झिट झाली की नाही हे एपिसोड प्रसारित झाल्यावरच स्पष्ट होऊ शकेल.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.