Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jug Jug Jiyo | वरुण धवन, कियारा अडवाणी, नीतू कपूर ‘कोरोना पॉझिटिव्ह’, आगामी चित्रपटाचे चित्रीकरण थांबवले!

‘जुग जुग जियो’ या चित्रपटाच्या सेटवर काही लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहेत, त्यानंतर या चित्रपटाचे चित्रीकरण बंद करण्यात आले आहे.

Jug Jug Jiyo | वरुण धवन, कियारा अडवाणी, नीतू कपूर ‘कोरोना पॉझिटिव्ह’, आगामी चित्रपटाचे चित्रीकरण थांबवले!
Follow us
| Updated on: Dec 04, 2020 | 2:12 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan), अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि जेष्ठ अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) सध्या चंदिगडमध्ये ‘जुग जुग जियो’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. मात्र, आता या चित्रपटाचे चित्रीकरण बंद करण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. या चित्रपटाच्या सेटवर काही लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे कळते आहे. तर, चित्रपटातील कलाकारही कोरोनाच्या विळख्यात अडकल्याची माहिती समोर येत आहे (Kiara Advani, Varun Dhawan, Neetu Kapoor tested corona positive).

मीडिया रिपोर्टनुसार, ‘जुग जुग जियो’ या चित्रपटाच्या सेटवर काही लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहेत, त्यानंतर या चित्रपटाचे चित्रीकरण बंद करण्यात आले आहे. परंतु, अद्याप याची खातरजमा झालेली नाही. गुरुवारी संध्याकाळी तिन्ही कलाकारांचा कोरोना अहवाल आला असून, त्यामध्ये तिन्ही कलाकार पॉझिटिव्ह असल्याचे म्हटले जात आहेत.

नीतू कपूर यांचे पुनरागमन

वरुण धवन आणि कियारा अडवाणी हे दोघेही या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. यापूर्वी ही जोडी धर्मा प्रॉडक्शनच्या ‘कलंक’ या चित्रपटातील एका गाण्यामध्ये दिसली होती. ‘जुग जुग जिओ’ चित्रपटात कियारा अडवाणी आणि वरुण धवन व्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर आणि अभिनेत्री नीतू कपूर देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

दिग्दर्शक राज मेहता या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री नीतू सिंह यांनी नुकतेच चित्रीकरणादरम्यान सेटवरील त्यांचा एक सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होता. या फोटोत नीतू शॉटसाठी तयार होताना दिसल्या होत्या. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर पहिल्यांदाच चित्रीकरण करत आहेत. नीतूला पुन्हा एकदा स्क्रीनवर पाहून चाहते खूप आनंदित झाले आहेत. सोशल मीडियावर हा फोटो पोस्ट करत नीतू यांनी लिहिले की, ‘बऱ्याच वर्षानंतर मी सेटवर परत येत आहे. एक नवीन सुरुवात आणि चित्रपटांची जादू आहे. मला थोडी भीती वाटते पण, मला माहित आहे की तू नेहमीच माझ्याबरोबर आहेस.’(Kiara Advani, Varun Dhawan, Neetu Kapoor tested corona positive)

अधिकृत घोषणेची शक्यता

चित्रपटाशी निगडित सूत्रांचे म्हणणे आहे की, याक्षणी चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. आज संध्याकाळपर्यंत चित्रपटाच्या टीमनकडून याबाबत अधिकृत विधान केले जाऊ शकते, अशी अशी अपेक्षा आहे. नुकतेच अभिनेता आणि भाजपचे खासदार सनी देओल हिमाचल प्रदेशात सुट्टीवर गेलेले असताना, त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हिमाचल प्रदेशातच त्यांना विलागीकरणात ठेवण्यात आले आहे.

(Kiara Advani, Varun Dhawan, Neetu Kapoor tested corona positive)

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.