आमिरचं कुटुंब त्याच्यापेक्षा जास्त.. किरण रावच्या वक्तव्याची चर्चा

2021 मध्ये अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी घटस्फोट जाहीर करत सर्वांना मोठा धक्का दिला. मात्र घटस्फोटानंतरही या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण नातं आहे. इतकंच नव्हे तर आमिरची पहिली पत्नी रिना दत्तासोबतही किरणची चांगली मैत्री आहे. याविषयी किरण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाली.

आमिरचं कुटुंब त्याच्यापेक्षा जास्त.. किरण रावच्या वक्तव्याची चर्चा
घटस्फोटानंतरही आमिरसोबत मैत्रीपूर्ण नातं का? किरण रावने दिलं उत्तर Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 15, 2024 | 1:13 PM

मुंबई : 15 फेब्रुवारी 2024 | बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानची पूर्व पत्नी किरण राव सध्या तिच्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचं प्रमोशन दोघं मिळून करतायत. याआधी आमिर आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता यांची मुलगी आयरा खानच्या लग्नातही किरणला पाहिलं गेलं. घटस्फोटानंतरही आमिर आणि त्याच्या पहिल्या पत्नीसोबत किरणची असलेली मैत्री पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत किरण याविषयी व्यक्त झाली. आम्ही सर्वजण एकाच इमारतीत राहतो, असाही खुलासा किरणने यावेळी केला.

आमिरच्या पहिल्या पत्नीसोबत मैत्री

“जेव्हा कधी मी आणि रिना मिळून बाहेर जातो, तेव्हा पापाराझी आम्हाला पाहून थक्क होतात. रिना आणि माझ्यात खूप चांगली मैत्री आहे. म्हणूनच आमचं एकमेकींशी जुळतं. पण यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. सध्याच्या घडीला लोक मॉडर्न कुटुंब आणि कुटुंब 2.0 बद्दल बोलतात. मग आम्ही एकत्र फिरण्यावर आक्षेप का? माझ्या मते हे असंच असायला हवं. ज्या लोकांना त्यांच्या एक्ससोबत, पूर्व पत्नी किंवा पूर्व पतीसोबत मित्र म्हणून राहायचं असेल तर त्यांना मी टिप्स द्यायला तयार आहे. लग्न हे अत्यंत अद्भुत नातं आहे. त्यामुळे घटस्फोटानंतरही तुम्ही मित्र किंवा कुटुंब म्हणून हे नातं पुढे नेऊ शकता. प्रत्येकवेळी सर्वकाही तोडण्याची गरज नसते”, असं किरणने सांगितलं.

हे सुद्धा वाचा

घटस्फोटानंतरचं नातं

घटस्फोटानंतर आमिरसोबत असलेल्या नात्याविषयी किरण पुढे म्हणाली, “तुम्ही इतर एक्स कपल्सना पाहिलात तर तेसुद्धा तुम्हाला एकमेकांशी चांगलं वागताना दिसतील. मात्र हे प्रत्येक नात्यात होत नाही. आमीर आणि मी एकत्र काम करतो, एकाच इमारतीत राहतो आणि त्याचं कुटुंब हे त्याच्यापेक्षा जास्त माझं आहे. म्हणूनच आमचं नातं असामान्य आहे असं मला वाटतं.” आमिर आणि किरणने 2005 मध्ये एकमेकांशी लग्न केलं. आमिरचं हे दुसरं लग्न होतं. या दोघांना आझाद हा मुलगा आहे. 2021 मध्ये या दोघांनी घटस्फोट जाहीर करत चाहत्यांना मोठा धक्का दिला. मात्र घटस्फोटानंतरही किरण आणि आमिर यांच्यात मैत्रीपूर्ण नातं आहे. किरणच्या आगामी ‘लापता लेडीज’ या चित्रपटाचं प्रमोशन दोघं मिळून करत आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.