Shehnaaz Gill हिचं बॉडी शेमिंगवर मोठं वक्तव्य; म्हणाली, ‘लोकांना वाटायचं मी फक्त…’
लोकांची समज शहनाज गिल हिने केली दूर... बॉडी शेमिंगवर अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य... तिचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून सेलिब्रिटींसह चाहते थक्क... नक्की काय म्हणाली शहनाज?
मुंबई : अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. ‘बिग बॉस १६’ मध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करत अभिनेत्रीने चाहत्यांचं मन जिंकलं. त्यानंतर शहनाजने कधीही मागे वळून पाहिलं नाही. अभिनेत्रीच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले, पण शहनाज हिने मोठ्या धैर्याने सर्व संकटांवर मात केलं. बिग बॉसच्या घरात पंजाबची कतरिना म्हणून ओळख मिळवलेली शहनाज आज नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्ध आहे. आज शहनाजच्या ग्लॅमरस आणि हॉट अदांवर चाहते फिदा होतात. पण एक काळ असा होता जेव्हा शहनाजला जाड शरिरामुळे ट्रोल केलं जायचं. पण आता अभिनेत्रीने तिच्या परफेक्ट फिगरने सर्वांना हैराण केलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अभिनेत्रीत अनेक बदल झाले आहे. ज्यामुळे शहनाजची लोकप्रियता अधिक वाढली आहे.
शहनाज तिच्या लूकमुळे कायम चर्चेत असते. शिवाय अभिनेता सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमातून शहनाज हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवरल धुमाकूळ घालत आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. सिनेमासाठी अभिनेत्रीने देखील मोठी मेहनत घेतली आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री तिच्या प्रवासाबद्दल आणि बॉडी शेमिंगबद्दल मोठा खुलासा केला आहे. शहनाज म्हणाली, ‘मी स्वतःला प्रचंड बदललं आहे. मी स्वतःवर काम केलं आहे. मला ज्या लोकांनी उत्तम सल्ले दिले त्यानुसार मी काम केलं आणि स्वतःला सुधारलं. मी वजन कमी केलं, कारण बिग बॉसमध्ये असताना माझ्यावर बॉडी शेमिंग सारख्या कमेंट करण्यात आल्या…’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘लोकांची समज मी बदलली आहे. अनेकांना वाटायचं मी फक्त सलवार सूट घालू शकते. पण आता मी पुढे जात आहे…’ शहनाज हिने तिच्या करियरची सुरुवात २०१७ पासून केली. शहनाजने ‘सत श्री अकाल इंग्लंड’ या पंजाबी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर शहनाजने कधीही मागे वळून पाहिलं नाही. शहनाज एक उत्तम गायक देखील आहे. आता अभिनेत्री बॉलिवूडमध्ये स्वतःची नवी ओळख तयार करत आहे.
शहनाज हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्यासोबत शहनाज रिलेशनशिपमध्ये होती. दोघांच्या लग्नाच्या चर्चा देखील चाहत्यांमध्ये तुफान रंगल्या. शिवाय चाहत्यांनी देखील दोघांच्या जोडीला डोक्यावर घेतलं. ‘बिग बॉस’च्या घरात देखील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली. पण सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज पूर्णपणे कोलमडली होती.
पण गेल्या काही दिवसांपासून शहनाज आणि राघव जुयाल यांच्या नात्याची तुफान चर्चा रंगत आहे. शहनाज आणि राघव याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमातून शहनाज आणि राघव एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसत आहेत.