kisi ka bhai kisika jaan : सर्वत्र पलक तिवारी हिच्या सावत्र आईची चर्चा, वडिलांच्या आयुष्यात तिसरी महिला कोण?

पलक तिवारी हिच्या वडिलांच्या आयुष्यात तिसरी महिला नक्की आहे तरी कोण? अभिनेत्रीच्या सावत्र आईची सर्वत्र चर्चा... श्वेता तिवारी 'सिंगल मदर' म्हणून करते दोन मुलांचा सांभाळ...

kisi ka bhai kisika jaan : सर्वत्र पलक तिवारी हिच्या सावत्र आईची चर्चा, वडिलांच्या आयुष्यात तिसरी महिला कोण?
Follow us
| Updated on: Apr 23, 2023 | 10:29 AM

मुंबई : टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी (palak tiwari) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडिया स्टार असलेल्या पलक हिने अभिनेता सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमात पलक महत्त्वांच्या भूमिकेत दिसत आहे. सिनेमा २१ एप्रिलला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. सिनेमात पलकला पाहिल्यानंतर अनेकांनी अभिनेत्रीचं कौतुक केलं. श्वेताने देखील लेकीचा पहिला सिनेमा पाहिल्यानंतर कौतुक केलं. पलक ही श्वेता आणि राजा चौधरी यांची मुलगी आहे. पण लग्नाच्या काही वर्षांनंतर श्वेता आणि राजा यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

लग्नाच्या ९ वर्षांनंतर श्वेताने पहिला पती राजा याच्यावर घरगुती हिंसाचाराचे आरोप लावले. राजा चौधरी अभिनेता, लेखक आणि निर्माता आहे. भोजपुरी सिनेमातून दोघांची ओळख झाली आणि ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. ‘सैंया हमरा हिंदुस्तानी’ सिनेमात श्वेता आणि राजा यांनी एकत्र काम केलं. श्वेता आणि राजा यांचं लग्न १९९८ साली झाली. त्यानंतर २००७ साली दोघांचं घटस्फोट झालं. (shweta tiwari daughter palak tiwari)

palak tiwari

श्वेता हिच्यापासून विभक्त झाल्यानंतर राजा चौधरी याने दुसरं लग्न केलं. राजाच्या दुसऱ्या पत्नीचं नाव श्वेता सूद असं आहे. श्वेता सून दिल्ली येथील राहणारी असून कॉरपोरेट प्रोफेशनल आहे. पण राजा सोशल मीडियावर कायम अन्य महिलेसोबत फोटो पोस्ट करत असतो. त्या महिलेसोबत फोटो पोस्ट केल्यानंतर चाहते कायम राजाला ‘तिसरं लग्न केलं आहे का?’ असा प्रश्न विचारतात.

राजाच्या आयुष्यात कितीही चढ – उतार असले तरी राजा कायम मुलगी पलक हिला भेटत असतो. शिवाय पलक वडिलांसोबत वाढदिवस देखील साजरा करते. राजाला घटस्फोट दिल्यानंतर श्वेताने अभिनव कोहली याच्यासोबत २०१६ मध्ये लग्न केलं. अभिनव आणि श्वेता यांना एक मुलगा आहे. पण अभिनेत्रीने दुसऱ्या पतीवर देखील गंभीर आरोप केले. त्यानंतर २०१९ मध्ये अभिनव आणि श्वेता यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

श्वेता आता सिंगल मदर म्हणून पलक आणि रेयांश यांचा सांभाळ करत आहे. पलक आणि श्वेता यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पलक आणि श्वेताच्या सौंदर्याची चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगत असते. सोशल मीडियावर देखील दोघींच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. पलक आणि श्वेता सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.