Special Story | तुम्हाला फिल्म बनवायची आहे? तर ‘या’ गोष्टी कराव्या लागतील

मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहताना तो खूप सोपा वाटतो, मात्र त्यामागचे कष्ट, सिनेमा निर्मितीसाठी लागणारी मेहनत, वेळ, कलाकार-तंत्रज्ञांची फौज, पैसा किती अचाट आणि अफाट आहे, याची आपल्याला कल्पना नाही (Film Crew Members Responsibilities)

Special Story | तुम्हाला फिल्म बनवायची आहे? तर 'या' गोष्टी कराव्या लागतील
Follow us
| Updated on: Jan 31, 2021 | 12:05 AM

मुंबई : सिनेमा बघितल्यानंतर नेहमी आपण अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक यांचीच चर्चा करतो. सिनेमा चांगला असला तर सर्व कौतुकंही यांचंच होतं. पण, एक सिनेमा बनवण्यासाठी फक्त या तिघांची नाही तर 100 पेक्षा जास्त लोकांची गरज असते. 100 पेक्षा जास्त लोक मिळून काम करतात तेव्हा एक सिनेमा तयार होतो. त्यामुळे जर तुम्हाला कधी सिनेमा बनवायची इच्छा झाली तर खालील या काही गोष्टी तुम्हाला माहित असणे गरजेचं आहे. (Know About A Film Crew Members And Their Work Responsibilities)

कुठलाही सिनेमा पूर्ण होण्यासाठी तीन टप्पे असतात. प्री प्रोडक्शन, दुसरा प्रोडक्शन आणि तिसरं पोस्ट प्रोडक्शन. प्री प्रोडक्शन स्टेजमध्ये सिनेमाचं शूटिंग, कहाणीवर यावेळी काम केलं जातं आणि प्रोडक्शनमध्ये शूटिंग केलं जातं आणि पोस्ट प्रोडक्शनमध्ये शूटिंग नंतरचं काम केलं जातं.

लेखक

लेखक सिनेमा लिहितात, की सिनेमा कसा असेल आणि कहाणी काय असेल. अनेकदा अनेक लोक मिळून एक कहाणी लिहितात.

डायलॉग राइटर

हा सिनेमाचे सर्व डायलॉग लिहितात जे अभिनेता-अभिनेत्री आणि इतर कलाकार बोलतात.

स्क्रीन रायटर

हा सिनेमाच्या कहाणीच्या आधारे, डायलॉगच्या आधारे सीन डिझाईन करतात, ज्यामध्ये स्क्रिप्टच्या आधारे सीन लिहितात आणि कुठला सीन कशा प्रकारे शूट केला जाईल हे ठरवतात.

लोकेशन मॅनेजर

लोकेशन मॅनेजर पूर्ण स्क्रिप्ट वाचतो आणि त्या कहाणीच्या हिशोबाने त्या लोकेशन्सवर काम करतात. कुठला सीन कुठे शूट केला जाईल हे ठरवतात.

सेट डिझायनर

सेट डिझायनर आर्ट डिझायनरसोबत काम करतो आणि स्क्रिप्टच्या आधारे सेट बनवण्याचं काम करतात.

आर्ट डायरेक्टर

आर्ट डायरेक्टर प्रोडक्शन, सेट, इंटिरिअर इत्यादी गोष्टींवर काम करतो आणि आर्ट रिलेटेड काम करतो. हा सिनेमॅटोग्राफरसोबत काम करतात जेणेकरुन सेटला योग्य लुक मिळेल.

दिग्दर्शक

दिग्दर्शक सिनेमाचा एक भाग आहे. सुरुवातीपासून अखेरपर्यंत सिनेमाच्या प्रत्येक वळणावर त्यांची मुख्य भूमिका असते.

निर्माता

निर्मात्याचं कामही सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत असतं आणि ते एक प्रकारे सिनेमाचे हेड असतात. कारण, ते सिनेमा बनवण्यासाठी पैसा लावतात.

सिनेमॅटोग्राफर

कॅमऱ्याबाबतचं सर्व काम पाहणाऱ्या व्यक्तीला सिनेमॅटोग्राफर म्हणतात. जर कुठल्या दिग्दर्शकाला कुठला वेगळा शॉट हवा असेल, तर तो डायरेक्टर ऑफ फोटोग्राफीला सांगतो. तो कॅमरामनच्या मदतीने शॉट घेतो. या प्रोसेसला सिनेमॅटोग्राफी म्हणतात.

लाईन प्रोड्युसर

लाईन प्रोड्युसर एका प्रकारे पैशांचा हिशोब ठेवतो आणि सिनेमावर होणाऱ्या खर्चाची सर्व माहिती ठेवतो. वेगवेगळ्या जागी शूटिंगची व्यवस्था करतो.

प्रोडक्शन मॅनेजर

हा क्रू आणि प्रोडक्शनसाठी आवश्यक टेक्निकल सामान पूरवते आणि अनेक बिझनेस डीलही करतात.

असिस्टंट डायरेक्टर

हा डायरेक्टरसोबत कोम करतो आणि डायरेक्टरच्या कामात मदत करतो. सिनेमात एकापेक्षा जास्त असिस्टंट डायरेक्टर असू शकतात.

अभिनेते

हे ते लोक असतात, जे सिनेमात अभिनय करतात आणि निर्देशक यांना वेगवेगळ्या सीन्ससाठी निर्देशन करतात.

कंट्युनिटी पर्सन

कंट्युनिटी पर्सन हा प्रत्येक शॉटची माहिती ठेवतो. ज्यामध्ये त्या शॉटची लांबी, किती रीटेक किंवा शॉट ते नवीन शॉटची कंट्युनिटी यासर्वांची माहिती ठेवतो.

कॅमरा ऑपरेटर

हा कॅमेरा ऑपरेट करतो आणि क्रूमध्ये अनेक जण कॅमरा ऑपरेटर असतात. यांचे अनेक असिस्टेंट आणि हेल्पर असतात. कॅमरा ऑपरेटर अनेक प्रकारचे असतात.

साऊंड मिक्सर

एडिटिंगवेळी साऊंडवर काम करावं लागतं. पण शूटिंगदरम्यान, सीन शूट करण्यात मदत करतो.

विझ्युअल इफेक्ट डायरेक्टर

अनेक शॉट क्रोमावर शूट केलं जातं आणि यावेळी टेक्निकल बाबींकडे लक्ष देतो आणि हे काम करतात विझ्यिुअल इफेक्ट डायरेक्टर. यांच्यासोबतही मोठी टीम असते.

कॉस्ट्युम डिझाईनर

अॅक्टिंग करणाऱ्या लोकांच्या कॉस्ट्युमवर काम करावं लागतात. हे लोक सेटच्या आधारे अभिनेता-अभिनेत्रींसाठी कपडे तयार करतात.

मेकअप आर्टिस्ट

मेकअप आर्टिस्ट कलाकारांचा मेकअप करतात. यामध्ये हेअर ड्रेसर, बॉडी मेकअप इत्यादीसाठी वेगवेगळे लोक असतात.

ट्रान्सपोर्टेशन कॉर्डिनेटर

हे लोक अभिनेत्यांच्या राहण्याची, खाण्या-पिण्याची व्यवस्था करतात.

युनिट पब्लिसिस्ट

हे मीडियामध्ये सिनेमाची माहिती देतात, प्रेस रिलीज सारखी कामं करतात.

एडिटर

हे सिनेमाला एडिट करण्याचं काम करतात. यामध्ये वेगवेगळे एडिटर असतात. ते सिनेमाला कहाणीच्या आधारे ए़़डिट करतात.

साऊंड मिक्सर

सिनेमात साऊंड खूप महत्त्वाचा असतो, हे लोक साऊंडवर काम करतात. यामध्ये सिनेमाचं बॅकग्राउंडपासून ते स्पेशल इफेक्टपर्यंत सर्वांवर लक्ष दिलं जातं.

म्युझिक डायरेक्टर

ज्या सिनेमांमध्ये गाणी असतात त्यांना शूट करण्याची प्रोसेसही वेगळी असते, म्युझिक डायरेक्टरवर यासर्वांची जबाबदारी असते.

म्युझिक टीम

म्युझिक टीम खूप मोठी असते, यामध्ये लिरिक्स रायटर, कंपोझर, गायक इत्यादी काम करतात

प्रमोशन अँड मार्केटिंग

त्याशिवाय, मार्केटिंग आणि प्रमोशन हे देखील एक मोठ काम असतं. सिनेमा पूर्ण झाल्यानंतर प्रमोशनवर काम केलं जातं.

लीगल टीम

सिनेमाची एक लीगल टीमही असते, जी सिनेमाबाबतच्या सर्व कायदेशीर प्रक्रिया पाहाते

स्पॉट बॉय

हे लोक सेटवरील ते लोक असतात जे सर्व टीम्सची मदत करतात आणि सेटवर सर्व सांभाळतात

या लोकांशिवायही अनेक लोक एक सिनेमा बनवण्यासाठी रात्रंदिवस काम करत असतात.

Know About A Film Crew Members And Their Work Responsibilities

'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.