पत्रकार बनण्याचे स्वप्न बाजूला राहिले अन् बनली अभिनेत्री, पाहा आता काय करतेय मिनिषा लांबा

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आल्या ज्यांनी काही चित्रपट करून खूप प्रसिद्धी मिळवली, मात्र काहीच दिवसांत त्या गायब झाल्या. अशाच अभिनेत्रींपैकी एक आहे मिनिषा लांबा (Minishha Lamba). मिनिषाने लाईम लाईटचा अनुभव घेतला मात्र ती नंतर गायब झाली.

पत्रकार बनण्याचे स्वप्न बाजूला राहिले अन् बनली अभिनेत्री, पाहा आता काय करतेय मिनिषा लांबा
मिनिषा लांबा
Follow us
| Updated on: May 30, 2021 | 8:54 AM

मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आल्या ज्यांनी काही चित्रपट करून खूप प्रसिद्धी मिळवली, मात्र काहीच दिवसांत त्या गायब झाल्या. अशाच अभिनेत्रींपैकी एक आहे मिनिषा लांबा (Minishha Lamba). मिनिषाने लाईम लाईटचा अनुभव घेतला मात्र ती नंतर गायब झाली. मग नंतर, ती एकतर एखाद्या म्युझिक व्हिडीओमध्ये किंवा एखाद्या जाहिरातीमध्ये दिसली होती. मिनिषा लांबाचे आयुष्य असेच सुरु आहे. या क्षणी, मिनिषा लांबा तिच्या एका चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज आशु यांनी केले आहे (Know About actress Minissha Lamba and her career).

या चित्रपटामध्ये ए-लिस्टर कलाकार नसल्यामुळे या चित्रपटाची बातमी सध्या तरी कुठे आलेली नाही. टीव्ही अभिनेता करणवीर बोहरा आणि अभिनेते संजय मिश्रा या चित्रपटात मिनीषा लांबासोबत दिसणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर, मिनिषाने काही काळ विश्रांती घेतली आणि आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवण्यासाठी बाहेर गेली.

सध्या काय करतेय मिनिषा?

View this post on Instagram

A post shared by Minissha (@minissha_lamba)

इंडिया टीव्हीच्या वृत्तानुसार, मिनीषा लांबा सध्या आपल्या कुटुंबासमवेत दिल्लीच्या न्यू फ्रेंड्स कॉलनी भागात राहत आहे. मिनिषाला चर्चेत राहणे आवडत नाही, म्हणूनच तिने इंडस्ट्रीपासून मर्यादित अंतर बाळगले आहे. अहवालानुसार, मिनिषा म्हणाली की, ‘मी बर्‍याच दिवसांपासून मुलाखत दिली नाही, परंतु हे प्रथमच घडत नाहीय. चित्रपटांपासून दूर असूनही, मी परत येण्यास उत्सुक आहे. मला चांगल्या ऑफर मला मिळत नव्हत्या, म्हणून मला आणखी प्रतीक्षा करावी लागली. तो काळ माझ्यासाठी कठीण होता.’

पत्रकार होण्याचे स्वप्न, पण बनली अभिनेत्री!

मिनिषा लांबाला पत्रकार व्हायचं होतं. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत मिनिषा म्हणाली होती की, मला पत्रकार व्हायचे होते. या क्षेत्रासाठी मी स्वत:ला चांगल्याप्रकारे तयार केले होते. मी माझे इंग्रजी ऑनर्स पूर्ण केले. परंतु, माझ्या नशीबात काही वेगळेच होते. माझ्या नशिबाने माझ्यासाठी काही वेगळ्या योजना तयार केल्या होत्या. जेव्हा मी पदवीच्या शेवटच्या वर्षामध्ये होते, तेव्हा मला विविध जाहिरातींच्या ऑफर मिळू लागल्या. अशाच एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान, शूजित सरकार त्यांच्या ‘यँहा’ चित्रपटासाठी माझ्याकडे आले. या चित्रपटानंतर मी मागे वळून पाहिले नाही (Know About actress Minissha Lamba and her career).

मिनिषा लांबाची कारकीर्द तिला हवी तशी नव्हती. ‘यँहा’ चित्रपटानंतर मिनिषा लांबाने ‘कॉर्पोरेट’, ‘रॉकी द रिबेल’, ‘हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड’, ‘दस कहानियां’, ‘बचना ए हसीनो’, ‘किडनॅप’, ‘जिला गाझियाबाद’, ‘भूमी’सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मोठ्या पडद्याशिवाय मिनिषा लांबा छोट्या पडद्यावरदेखील दिसली. ‘तेनाली रामा’, ‘बिग बॉस सीझन 8’, ‘छुना है आसमान’, ‘कॉमेडी नाईट्स बचाओ’ आणि ‘इंटरनेट वाला प्रेम’ या कार्यक्रमांमध्ये दिसली आहे.

प्रेम प्रकरणामुळे आली चर्चेत

फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्याबरोबरच तिची प्रेम प्रकरणही वादात राहिली. 2011मध्ये जेव्हा क्रिकेटपटू युवराज सिंगने एका मुलीला चुंबन घेतलेला फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला, तेव्हा मिनिषा लांबा बरीच वादात अडकली. वास्तविक या फोटोतील मुलगी मिनिषाच असल्याचे म्हटले जात होते. मात्र, माध्यमांसमोर आल्यानंतर मिनिषाने या फोटोचे सत्य उघड केले. ती म्हणाली, युवराज सिंगसोबत तिचे प्रेम वैगरे काही नव्हते आणि व्हायरल होणाऱ्या या फोटोत केवळ तिच्यासारखी दिसणारी मुलगी असल्याचे मिनिषाने म्हटले होते. युवराजशिवाय मिनिषाचे नाव एकदा राज बब्बर यांचा मुलगा आर्य बब्बरशी देखील जोडले गेले होते.

(Know About actress Minissha Lamba and her career)

हेही वाचा :

Video | पुन्हा एकदा दिसला मल्लिका शेरावतचा बोल्ड अंदाज, ‘पूल’मधील व्हिडीओचा इंटरनेटवर धुमाकूळ!

Idian Idol 12 | अभिजीत सावंतनंतर मियांग चँगची ‘इंडियन आयडॉल’वर प्रतिक्रिया, कॉन्ट्रोवर्सीबद्दल बोलताना म्हणाला…

सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.