Anjali Arora: कोण आहे आकाश? अंजली अरोराच्या व्हायरल MMS नंतर सोशल मीडियावर होतेय चर्चा

काही दिवसांपूर्वी अंजलीला एमएमएस व्हिडीओ लीक झाल्याचा दावा केला जात होता. त्यावर तिने प्रतिक्रियाही दिली होती. आता सोशल मीडियावर अंजलीसोबत तिचा बॉयफ्रेंड आकाश संसनवाल याची चर्चा होत आहे.

Anjali Arora: कोण आहे आकाश? अंजली अरोराच्या व्हायरल MMS नंतर सोशल मीडियावर होतेय चर्चा
अंजली अरोराच्या व्हायरल MMS नंतर सोशल मीडियावर होतेय चर्चाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 2:30 PM

‘कच्चा बदाम’ (Kaccha Badam) या सोशल मीडियावर गाजलेल्या गाण्यावर डान्स करत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेल्या अंजली अरोराने (Anjali Arora) आता पुन्हा एकदा नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. मात्र यावेळी ती तिच्या कथित एमएमएस व्हिडिओमुळे (MMS Video) चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी अंजलीला एमएमएस व्हिडीओ लीक झाल्याचा दावा केला जात होता. त्यावर तिने प्रतिक्रियाही दिली होती. आता सोशल मीडियावर अंजलीसोबत तिचा बॉयफ्रेंड आकाश संसनवाल याची चर्चा होत आहे. सोशल मीडियावर जाणूनबुजून अंजलीची बदनामी केली जात असताना आकाशने तिची खूप साथ दिली असं म्हटलं जातंय. यामुळेच तो ‘मोस्ट वाँटेड बॉयफ्रेंड’ बनलाय, अशीही कमेंट नेटकऱ्यांकडून केली जात आहे.

कोण आहे आकाश संसनवाल?

आकाश संसनवाल हा व्यवसायाने डिजिटल क्रिएटर आहे. तो इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असतो. अनेकदा तो रिल्सही शेअर करतो. आकाश हा स्वतःच्या नावाने इन्स्टाग्रामवर भाजपचंही अकाऊंट सांभाळतो. या अकाऊंटवर तो दक्षिण दिल्लीचे खासदार रमेश बिधुरी यांचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असतो. आकाशचे इंस्टाग्रामवर 23.1 हजार फॉलोअर्स आहेत. तो अनेकदा अंजली अरोरासोबतचे फोटो आणि रिल्स पोस्ट करतो. अंजली अरोरा आणि आकाश संसनवाल जवळपास दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

व्हायरल MMS वर अंजलीची प्रतिक्रिया

आरजे सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत अंजली म्हणाली, “हे लोक काय करत आहेत ते मला माहीत नाही. माझं नाव टाकून, माझा फोटो टाकून, हा अंजली अरोराचा एमएमएस आहे असं ते दाखवतायत. ते असं का करत आहेत हे मला माहित नाही. त्यांचंही कुटुंब असेल, माझंही कुटुंब आहे.’ असं म्हणताना अंजलीला अश्रू अनावर झाले. ती पुढे म्हणाली, “कधी कधी मला प्रश्न पडतो की हे लोक असं का करतात. युट्यूबवरील क्षुल्लक व्ह्यूजसाठी ते माझी बदनामी करत आहेत. पण माझं पण एक कुटुंब आहे, मला एक भाऊ आहे, एक बहीण आहे. माझे लहान भाऊ आहेत जे या सर्व गोष्टी पाहतात. जेव्हा तुम्ही कोणाशी बरोबरी साधू शकत नाही, तेव्हा तुम्ही बदनामी करता.”

हे सुद्धा वाचा

‘कच्चा बदाम’वरील डान्समुळे मिळाली प्रसिद्धी

अंजली अरोराला सोशल मीडियातून प्रसिद्धी मिळाली. ‘कच्चा बदाम’वर डान्स करत तिने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओ इतका व्हायरल झाला की त्यामुळे ती रातोरात स्टार झाली. इन्स्टाग्रामवर तिचे 11 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. यानंतर ती एकता कपूरच्या ‘लॉक अप’ या रिॲलिटी शोमध्ये झळकली. या शोमध्ये अंजली आणि स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुखी यांच्यातील नातं लोकांना खूप आवडलं आणि दोघांच्या नावाने हॅशटॅगही बनवण्यात आला. इतकंच नव्हे तर अंजलीने मुनव्वरला प्रपोजही केलं होतं. मात्र शो संपल्यानंतर दोघांचा ब्रेकअप झाला.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.