‘ज्या’ विकी जैनला अंकिता लोखंडे हिने नॅशनल टीव्हीवर मारली लाथ, त्याचे नेटवर्थ जाणून बसेल मोठा धक्का, थेट, हिरे…

अंकिता लोखंडे हिने मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवला आहे. पती विकी जैन याच्यासोबत अंकिता ही बिग बाॅस 17 मध्ये सहभागी झाली. अंकिता हिची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. मात्र, अंकिता आणि विकी यांच्यामध्ये मोठे वाद हे सातत्याने बघायला मिळत आहेत.

'ज्या' विकी जैनला अंकिता लोखंडे हिने नॅशनल टीव्हीवर मारली लाथ, त्याचे नेटवर्थ जाणून बसेल मोठा धक्का, थेट, हिरे...
Follow us
| Updated on: Nov 16, 2023 | 3:05 PM

मुंबई : अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे बिग बाॅस 17 मध्ये पोहचले आहेत. मात्र, यांच्यामध्ये मोठे वाद हे होताना दिसत आहेत. इतकेच नाही तर अंकिता लोखंडे हिने एका भांडणामध्ये विकी जैन याला लाथ मारली. मात्र, ज्या अंकिता लोखंडे हिने नॅशनल टीव्हीवर पती विकी जैन याला लाथ मारली तोच विकी जैन हा कोट्यावधी संपत्तीचा मालक आहे. विकी जैन याचे अनेक बिझनेस आहेत. विकी जैन हा महावीर इन्स्पायर ग्रुपचा व्यवस्थापकीय संचालक आहे. रिअल इस्टेट, लॉजिस्टिक्स, वीज निर्मिती, हिरे, वॉशरी ऑपरेशन्स आणि कोळसा अशा विविध क्षेत्रामध्ये त्याची कंपनी कार्यरत आहे.

आज विकी जैन हा कोट्यावधी संपत्तीचा मालक आहे. विशेष म्हणजे विकी जैन याचे शिक्षण पुण्यात झाले. त्याचा जन्म रायपुर छत्तीसगडमध्ये झालाय. विकी जैन याचा मुंबईमध्ये 8 बीएचके आहे, ज्याची किंमत आज कोट्यवधीच्या घरात आहे. मालदीवमध्ये विकी जैन याचा आलिशान असा व्हिला देखील आहे. याशिवाय मोठी हवेली त्याची छत्तीसगडमध्ये आहे.

फक्त हेच नाही तर विकी जैन याच्याकडे अत्यंत लग्झरी अशा गाड्या देखील आहेत. या गाड्यांची किंमत आज कोट्यवधीच्या घरात आहे. 2.10 कोटी रुपयांची लँड क्रूझर, 1 कोटी रुपयांची मर्सिडीज बेंझ अशा गाड्यांचे त्याच्याकडे कलेक्शन आहे. विकी जैन हा 100 कोटींपेक्षाही अधिक संपत्तीचा मालक असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.

दुसरीकडे अंकिता लोखंडे हिने मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवलाय. अंकिता लोखंडे हिने पवित्र रिश्ता मालिकेच्या माध्यमातूनच आपल्या करिअरची सुरूवात ही केलीये. अंकिता लोखंडे हिला त्याच मालिकेतून खरी ओळख ही मिळाली आहे. अंकिता लोखंडे ही विकी जैन याच्या अगोदर सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत रिलेशनमध्ये होती, मात्र सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत तिचे ब्रेकअप झाले.

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यामध्ये बिग बाॅस 17 च्या घरात मोठे वाद होताना दिसत आहेत. थेट अंकिता लोखंडे हिने विकी जैन याला म्हटले की तू माझा वापर केला आहेस. यासोबत विकी जैन याच्यावर अंकिता ही कायमच गंभीर आरोप हे करताना दिसते. सतत बिग बाॅस 17 च्या घरात अंकिता आणि विकी यांच्यामध्ये मोठे हंगामे हे होताना दिसत आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.