Aamir Khan: ‘कॉफी विथ करण 7’मध्ये आमिर खानने केली चूक, सोशल मीडियावर त्याची होतेय आलिया भट्टशी तुलना

या फेरीत जेव्हा करणने आमिरला भारतीय क्रिकेट संघातील तीन क्रिकेटपटूंची नावं विचारली तेव्हा आमिरने आधी विराट कोहलीचं नाव घेतलं. त्यानंतर तो रोहित शेट्टी म्हणतो.

Aamir Khan: 'कॉफी विथ करण 7'मध्ये आमिर खानने केली चूक, सोशल मीडियावर त्याची होतेय आलिया भट्टशी तुलना
Aamir Khan: 'कॉफी विथ करण 7'मध्ये आमिर खानने केली चूकImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 12:03 PM

चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोचा सातवा सिझन (Koffee With Karan 7) सध्या चर्चेत आहे. या आठवड्यात ‘लाल सिंग चड्ढा’ची स्टार कास्ट आमिर खान (Aamir Khan) आणि करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) शोमध्ये पाहुणे म्हणून उपस्थित होते. चॅट शोमध्ये या दोघांनीही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. यादरम्यान आमिरसोबत असं काही घडलं की तो आता नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. शोमध्ये त्याने अशा अनेक चुका केल्या आहेत ज्यामुळे त्याची तुलना आता आलिया भट्टशी होऊ लागली आहे. ‘कॉफी विथ करण 7’मध्ये करण जोहर पाहुणे म्हणून आलेल्या सेलिब्रिटींना विविध प्रश्न विचारतो. वैयक्तिक आयुष्य, सेक्स लाईफ यांबद्दलही तो मोकळेपणाने बोलतो. यादरम्यान अनेक खुलासे होतात, तर कधीही मस्करीही केली जाते. अनेकदा हे खुलासे चर्चेचा विषय बनतात. तर कधी त्यावरून वादही पेटतात. यावेळी आमिर खानसोबतही असंच काहीसं घडलं आहे.

करण जोहरच्या शोमध्ये आमिर खान आणि करीना कपूर खान हे एक गेम खेळत होते. यावेळी करण प्रश्न विचारत होता आणि ज्याला उत्तर माहित असेल तो लगेच बजर वाजवून उत्तर देत होता. या फेरीत जेव्हा करणने आमिरला भारतीय क्रिकेट संघातील तीन क्रिकेटपटूंची नावं विचारली तेव्हा आमिरने आधी विराट कोहलीचं नाव घेतलं. त्यानंतर तो रोहित शेट्टी म्हणतो. हे ऐकून करीना आणि करण दोघांनाही हसू अनावर होतं. त्यानंतर आमिरला त्याची चूक कळते आणि तो लगेच रोहित शर्माचं नाव घेतो आणि सॉरीही म्हणतो.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ 1-

ही चूक आमिरकडून एकदाच होत नाही. तर करणच्या दुसर्‍या प्रश्नाचं उत्तर देतानादेखील तो गोंधळून जातो. करण आमिरला अक्षय कुमारच्या दोन चित्रपटांची नावं सांगण्यास सांगतो. याचं उत्तर देताना तो आधी ‘खिलाडी’ असं नाव घेतो आणि नंतर ‘सुपर 30’ म्हणतो. ‘सुपर 30’ हा अक्षयचा नाही तर हृतिक रोशनचा चित्रपट होता. या एपिसोडनंतर आमिर खान सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे. तिची क्लिप व्हायरल होत असून त्याची तुलना आलिया भट्टशी केली जात आहे. आलिया याआधी जेव्हा ‘कॉफी विथ करण’मध्ये आली होती, तेव्हा भारताच्या राष्ट्रपतींचं नाव विचारलं असता तिने पृथ्वीराज चव्हाण असं उत्तर दिलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर तिची खिल्ली उडवली गेली होती.

पहा व्हिडीओ 2-

आमिर आणि करीनाच्या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, ‘लाल सिंह चड्ढा’चं दिग्दर्शन अद्वैत चंदनने केलं आहे. हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’चा हा अधिकृत हिंदी रिमेक आहे. यात आमिर आणि करीना व्यतिरिक्त साऊथ स्टार नागा चैतन्य आणि टीव्ही अभिनेत्री मोना सिंग यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 11 ऑगस्टला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.